AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain : मराठवाड्यातही मुसळधार, गोदावरीला पूर, जायकवाडी धरणातील पाणीपातळीत वाढ

गोदावरी नदीला पूर आला की या नदीतील पाणी पुढे जायकवाडी धरणात साठते. गतवर्षीही परतीच्या पावसाच्या दरम्यान जायकवाडी धरण हे ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या 10 दिवसांमध्ये मराठावाड्यातील पाणी पातळीत वाढ तर झालीच आहे पण आता जलसाठे तूडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागत आहे.

Heavy Rain : मराठवाड्यातही मुसळधार, गोदावरीला पूर, जायकवाडी धरणातील पाणीपातळीत वाढ
गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 12, 2022 | 10:56 AM
Share

औरंगाबाद : हंगामाच्या सुरवातीचा एक महिना (Marathwada) मराठवाड्यावर वरुणराजाची अवकृपा राहिलेली होती. त्यामुळे पाणीसाठ्यातील वाढ तर सोडाच पण (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या देखील होतील की नाही अशी स्थिती होती. मात्र, गेल्या 10 दिवसांमध्येच संपूर्ण चित्र बदलले आहे. पावसाची हजेरी आणि रखडलेल्या खरिपातील पेरण्या आणि आता नुकसानही. सर्वकाही गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे (Godavari River) गोदावरी नदीला पूरही या 10 दिवसांमधील पावसाने आला आहे. गोदावरी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. गतवर्षीही अशीच स्थिती ओढावली होती पण परतीच्या पावसाने. यंदा जुलै महिन्यातच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार याची धास्ती आतापासूनच लागली आहे. विभागातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पेरणी झालेले क्षेत्र आणि न झालेले क्षेत्रही धोक्यात आहे.

जायकवाडी धरणात पाण्याची आवक

गोदावरी नदीला पूर आला की या नदीतील पाणी पुढे जायकवाडी धरणात साठते. गतवर्षीही परतीच्या पावसाच्या दरम्यान जायकवाडी धरण हे ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या 10 दिवसांमध्ये मराठावाड्यातील पाणी पातळीत वाढ तर झालीच आहे पण आता जलसाठे तूडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागत आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाणी टंचाई तशी जाणवलीच नाही. तर आता 10 दिवसांतील पावसाने चित्रच बदलले आहे. गोदावरी नदीचे पाणी थेट धरणात येऊ लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.

सोयाबीनला सर्वाधिक फटका, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. शिवाय यंदा प्रतिकूल परस्थिती आणि पेरणीस उशीर होऊनदेखील शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला आहे. शिवाय पेरणीनंतर झालेल्या पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल अशी स्वप्ने शेतकरी रंगवत होते. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला पाऊस हा गेल्या 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे अधिकच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाने आता उघडीप दिली नाहीतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील दुबार पेरणीच करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादनावर आणि संपूर्ण खरीप हंगामावर परिणाम होईल असा अंदाज आहे.

पूलावरुन पाणी, वाहतूक बंद

गोदावरी नदीला तर पूर आला आहेच पण गावालगतच्या लहान-मोठ्या नद्याही ओव्हरफ्लो झाल्या आहेत. नदीला लागलीच पाणी आल्याने अनेक ठिकाणची पुलावरुन होणारी वाहतूक ठप्प आहे. नदी, नाले, ओढे हे तुडूंब भरले आहेत. केवळ 12 दिवसांमध्ये हे चित्र बदलले आहे. गोदावरी नदी ही दुथडी भरुन वाहण्यास सुरवात झाली आहे. डोमगाव परिसरात पुलावरुन पाणी आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ होत असून मराठवाड्यात देखील सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप