Hingoli Farmer : शेतीत पैसा नाही, पठ्ठ्या म्हणतोय हेलिकॉप्टरचा धंदा करु, शेतकऱ्यानं मागितलं 6 कोटी 65 लाखांचं कर्ज!!

अल्पभूधारक शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टरसाठी कर्ज मागितल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण त्याने हेलिकॉप्टरसाठीच का कर्ज मागितले असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. शेतकरी कैलास पतंगे यांचे म्हणणे आहे की, स्पर्धा तर सर्वच व्यवसायामध्ये आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतामधून उत्पादन पदरी पडत नाही.

Hingoli Farmer : शेतीत पैसा नाही, पठ्ठ्या म्हणतोय हेलिकॉप्टरचा धंदा करु, शेतकऱ्यानं मागितलं 6 कोटी 65 लाखांचं कर्ज!!
हिंगोलीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांने चक्क बॅंकेकडे 6 कोटी 65 लाख रुपये कर्जाची मागणी केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 2:34 PM

हिंगोली : शेतामध्ये काही राम नाही असं म्हणत अनेकजण शेतीतच राबतात. अपयशानंतर आगामी हंगामात यश मिळेल अशी आशा प्रत्येकालच आहे. पण हे सर्व मान्य नसणाऱ्या एका पठ्ठ्याने (Agribusiness) शेती व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅंकेकडे चक्क 6 कोटी 65 लाखाचे (Loan) कर्ज मागितलंय. वाटलं ना आश्चर्य पण हे खरंय.. काही करुन शेती परवडत नाही. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील कैलास पतंगे या शेतकऱ्याने असा काय पतंग उडविलाय की बॅंक अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झालीय. सध्या (Crop Loan) पीक कर्जासाठी मारामार असताना हिंगोलीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं चक्क हेलिकॉप्टर घेण्यासाठी भारतीय स्टेट ही मागणी केलीयं. त्यामुळे आता बॅंक काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

…म्हणून हेलिकॉप्टरसाठीच कर्ज

अल्पभूधारक शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टरसाठी कर्ज मागितल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण त्याने हेलिकॉप्टरसाठीच का कर्ज मागितले असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. शेतकरी कैलास पतंगे यांचे म्हणणे आहे की, स्पर्धा तर सर्वच व्यवसायामध्ये आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतामधून उत्पादन पदरी पडत नाही. शिवाय पतंगे यांनी असे एकले आहे की, हेलिकॉप्टर ह्या व्यवसायातुन एका तासाला 65 हजार मिळतात. त्यामुळे त्यांनी या कर्जाची मागणी केली आहे.

शेती विकण्याची तयारी पण..!

ताकतोडा येथील शेतकरी कैलास पतंगे यांनी हेलिकॉप्टरसाठी कायपण असा ठाम निर्धारच केला आहे. ज्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे ती शेती देखील हेलिकॉप्टरसाठी विकण्याची तयारी त्यांनी दर्शवली पण दोन एकर शेत विकून तरी कुठे हेलिकॉप्टर विकत भेटेल म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. मात्र, हेलिकॉप्टर घेऊन ते कोणता व्यवसाय करणार हे काही त्यांनी स्पष्ट केले नाही. पण पतंगे यांच्या अनोख्या अंदाजाची चर्चा सध्या पंचक्रोशीत रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

बॅंक अधिकाऱ्यांची बोलती बंद

ताकतोडा येथील कैलास पतंगे यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगावच्या भारतीय स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकाकडे ही 6 कोटी 65 लाख रुपये कर्जाची मागणी अर्जाद्वारे केली आहे. सध्या पीक कर्ज वाटपाचे काम सुरु असतानाच पतंगे यांनी अशी काय मागणी केली आहे की बॅंक अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली आहे. शिवाय अर्जामध्ये हेलिकॉप्टर घेण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. त्यामुळे बॅंकेकडून काय उत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.