Buldhana : लिंकिंग खत विक्रीतून शेतकऱ्यांची लूट, ‘स्वाभिमानी’ चा कृषी केंद्रासह कृषी अधिकाऱ्यांना सज्जड दम

| Updated on: Jun 16, 2022 | 10:12 AM

मागणीपेक्षा अधिकच्या खताचा पुरवठा झाल्याचे सांगण्यात येत आणि दुसरीकडे लिकिंग शिवाय खताची विक्रीच नाही असे प्रकार समोर येत आहेत. शिवाय कोणत्या खताची खरेदी करायची हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर कोणतेही नियम लादू नयेत. मात्र, हाच प्रकार कृषी विभागाच्या आशिर्वादाने सुरु आहे. कृषी विभाग आणि खत कंपन्या यांचे साटेलोटे असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Buldhana : लिंकिंग खत विक्रीतून शेतकऱ्यांची लूट, स्वाभिमानी चा कृषी केंद्रासह कृषी अधिकाऱ्यांना सज्जड दम
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलडाणा :  (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग आता सुरु झाली आहे. राज्यात मान्सून सक्रीय होत असल्याने (Fertilizer & Seed) खत आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. असे असताना लिंकिंग खत विक्रीमधून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये असाच प्रकार सुरु राहिला तर कृषी केंद्र चालकांसह कृषी अधिकाऱ्यांची कपडे काढून चोप दिला जाणार असल्याच इशारा (Swabhimani SHetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे. केवळ लिंकिंगच नाही तर मूळ किंमतीपेक्षा अधिकच्या दराने खत विक्रीचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या फसवणूकीचे प्रकार हे वाढणार आहेत. त्यामुळे वेळीच कृषी विभागाने कारवाई न केल्यास फसवणूक करणाऱ्यांची आणि याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.

खत कंपन्या अन् कृषी विभागाचे साटेलोटे

मागणीपेक्षा अधिकच्या खताचा पुरवठा झाल्याचे सांगण्यात येत आणि दुसरीकडे लिकिंग शिवाय खताची विक्रीच नाही असे प्रकार समोर येत आहेत. शिवाय कोणत्या खताची खरेदी करायची हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर कोणतेही नियम लादू नयेत. मात्र, हाच प्रकार कृषी विभागाच्या आशिर्वादाने सुरु आहे. कृषी विभाग आणि खत कंपन्या यांचे साटेलोटे असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. एका बाजूला जबरदस्ती लिंकिंग खताची शेतकऱ्यांना केली जाते आणि दुसऱ्या बाजूला कृषी विभाग आम्हाला सांगतो या खता ला आग्रह धरू नका. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणतेही निर्बंध लादू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

कृषिमंत्री संवेदनशील, विभागात सावळा गोंधळ

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे संवेदनशील आहेत मात्र, स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी हे खत कंपन्यांशी आपले हितसंबंध जोपासतात. त्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. तळागळातील यंत्रणा सक्षम न झाल्यास शेतकऱ्यांची लूट ही सुरुच राहणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री हे संवेदनशील असले तरी विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली तरच लूट थांबणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन

खत, बियाणे विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल होत असते. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य सोडून जर त्यांची लूट होत असेल तर मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडेल. जर का कुठेही शेतकऱ्याला लिंकिंग जबरदस्ती केली बोगस बियाणे विकले गेले तर मग त्या कृषी केंद्र चालकाचे कपडे काढून त्याला फटके दिल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले तर त्यांचीही गय केली जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.