Amravati Market : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोयाबीन दरावर, अंतिम टप्प्यात विक्रमी दर

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ महाराष्ट्रातील खरीप हंगामातील पिंकावरच नाही तर मध्यप्रदेशातही सोयाबीनचे उत्पादन घटलेले आहे. वाढती मागणी घटलेले उत्पादन आणि निर्माण झालेली सोयाबीनची टंचाई यामुळे सोयाबीन दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा परिणाम दरावर होत असल्याचे कृषितज्ञ सांगत आहे.

Amravati Market : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोयाबीन दरावर, अंतिम टप्प्यात विक्रमी दर
सोयाबीन पीक
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 11:29 AM

अमरावती : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ महाराष्ट्रातील (Kharif Season) खरीप हंगामातील पिंकावरच नाही तर मध्यप्रदेशातही  (Soybean Production) सोयाबीनचे उत्पादन घटलेले आहे. वाढती मागणी घटलेले उत्पादन आणि निर्माण झालेली सोयाबीनची टंचाई यामुळे (Soybean Rate) सोयाबीन दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा परिणाम दरावर होत असल्याचे कृषितज्ञ सांगत आहे. अमरावती बाजारपेठेत गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्य तेलाच्या किंमती ह्या नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने तेलबियांच्या साठ्यांवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम बाजारावर होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे भविष्यात अणखी दर वाढतील असे येथील व्यापारी यांनी सांगितले आहे.

सोयाबीनच्या दरात अशी झाली वाढ

यंदा उत्पादनात घट होऊनही हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 4 हजार 500 ते 5 हजार 500 या दरम्यान दर होते. मात्र, दिवसेंदिवस आवक कमीच होत गेली आणि सोयाबीन उत्पादक इतर देशातही सोयाबीनचे उत्पादन घटले याचा थेट परिणाम हा दरावर झाला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये अमरावती मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात 1 हजार 300 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या अमरावतीच्या बाजारात सोयाबीनचे दर 7 हजार ते 7 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहे.

युध्दजन्य परस्थितीचा काय परिणाम?

अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमधून कच्चे सोयाबीन तेल आयात केले जाते. यासोबतच अर्जेंटिना रशिया आणि युक्रेन येथून सुर्यफुलाचे तेल आयात केली जाते. युद्धजन्य स्थितीमुळे येथील आयात थांबल्याने तेलासाठी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची मागणी वाढली आहे. चीनमध्ये आधीच सोयाबीनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी देशात सोयाबीनचे दर सध्या वाढले आहेत.

उत्पादन घटले अन् मागणी वाढली

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. तेलबियांच्या मागणीत वाढ होत असताना मागणीनुसार पुरवठा हा झालेला नाही. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनची टंचाई ही तीव्रतेने जाणवत आहे. प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून सोयाबीनला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. भविष्यात उन्हाळी सोयाबीनची जरी आवक सुरु झाली तरी त्याचा थेट परिणाम दरावर होणार नाही. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचा भर हा साठवणूकीवरच आहे.

संबंधित बातम्या :

Latur : शेतकऱ्यांचा हाबाडा अन् पीकविम्याबाबत आश्वासन नव्हे थेट तोडगाच, लातुरात नेमके झाले काय?

Smart Farmer : महावितरणच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना ‘ऊर्जा’, नांदेड परिमंडळातील 3 हजार शेतकरी थकबाकीमुक्त

अतिरिक्त ऊसावर रामबाण उपाय, ऊसतोड कामगारांचा सत्कार अन् वाजत-गाजत स्वागत, नेमका प्रकार काय?