कांदा बिजोत्पादन : बियाणांबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन, किडीवर मिळवा असे नियंत्रण..!

गेल्या काही वर्षांपासून कांद्याला किमान सरासरीप्रमाणे दर मिळाले आहेत. ऊसाच्या पाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्यामुळे कांदा पिकातून नाही तर कांदा बियाणातूनही उत्पन्न मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. शिवाय हा शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या कांदा बिजोत्पादनाच्या क्षेत्रात पिकांवर गेंद पकडले आहे.

कांदा बिजोत्पादन : बियाणांबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन, किडीवर मिळवा असे नियंत्रण..!
कांदा बिजोत्पादनाच्या क्षेत्रात पिकांवर गेंद पकडले आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे किडीचा धोका निर्माण झाला आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 5:06 AM

लातूर : गेल्या काही वर्षांपासून (Onion Rate) कांद्याला किमान सरासरीप्रमाणे दर मिळाले आहेत. ऊसाच्या पाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्यामुळे कांदा पिकातून नाही तर (Onion Production) कांदा बियाणातूनही उत्पन्न मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. शिवाय हा शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या कांदा बिजोत्पादनाच्या क्षेत्रात पिकांवर गेंद पकडले आहे. मात्र, (Cloudy Weather) ढगाळ वातावरणामुळे सध्या गेंदांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बीजोत्पादन योग्य पध्दतीने होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे.मात्र, वेळीच या अळीचा बंदोबस्त केला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. यंदा कांदा बिजोत्पादनाचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला असून त्याचा फायदा कसा होतोय हे पहावे लागणार आहे.

कांदा बियाणे मागणीत वाढ

आतापर्यंत कांदा लागवड म्हणले की, विकते बियाणे आणि त्याची लागवड इथपर्यंतच सर्वकाही होते. पण वाढती मागणी पाहता शेतकरीच कांजा बिजोत्पादन करुन बियाणे निर्मिती करु लागला आहे. यामुळे घरगुती कांद्याची लागवड तर होतेच पण 3 हजार किलोप्रमाणे बियाणाला दरही मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे केवळ बिजोत्पादन करुन बियाणातून उत्पन्नाचे साधन बनवले आहे. यंदाच्या हंगामात तर बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत करार केले आहे. यंदा तर 35 हजार ते 55 हजारपर्यंत प्रतिक्विंटल असे दर मिळालेले आहेत.

कोणत्या अवस्थेत आहे बिजोत्पादनातील कांदा?

लागवडीनंतर आता बीजोत्पादनातील कांदा हे गेंद अवस्थेत आहे. हंगामाच्या सुरवातीला लागवड करण्यात पिकावरील गेंदअवस्थेत बी धरु लागले आहे. काही ठिकाणी बी हे परिपक्व अवस्थेत आहे. यंदा अगोदरच मधमाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे परपरागीकरणाची प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. यावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी मधमाशा आकर्षित झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना पुन्हा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

किडीवर काय आहे उपाययोजना?

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. यामध्ये नेटारायझेम, व्हर्टीकेलीया या औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे. अळीचा प्रादुर्भाव असेल तर लागलीच फवारणी गरजेची आहे शिवाय जर पावासाने हजेरी लावली तर पुन्हा उघडीप दिल्यानंतर हाच डोस देणे गरजेचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

संभाजी ब्रिगेडने अडविला पालकमंत्र्यांचा ताफा, सक्तीच्या वीजबिल वसुलीवर भरणे मामांनी काय सांगितला मधला मार्ग?

Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच

Sugar production: साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, यंदा हंगाम लांबणीवर, काय आहेत कारणे?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.