Latur Market: सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात…

| Updated on: Feb 14, 2022 | 3:34 PM

खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असल्याने सर्वकाही आता बाजारपेठेतील दरावरच अवलंबून होते. असे असातनाही हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांचे दर हे घसरलेलेच होते. पण दिवस काही तेच राहत नाहीत. शिवाय शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अभ्यास करुन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. त्याचा फायदा आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात होताना पाहवयास मिळत आहे.

Latur Market: सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात...
सलग चौथ्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे.
Follow us on

लातूर : खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असल्याने सर्वकाही आता बाजारपेठेतील दरावरच अवलंबून होते. असे असातनाही हंगामाच्या सुरवातीला (Agricultural Goods) सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांचे दर हे घसरलेलेच होते. पण दिवस काही तेच राहत नाहीत. शिवाय शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अभ्यास करुन विक्रीपेक्षा (Soybean Stock) सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. त्याचा फायदा आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात होताना पाहवयास मिळत आहे. कारण सोयाबीनचे बेंचमार्क असलेल्या (Latur Market) लातूरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात वाढ झाली होती. गेल्या सहा दिवसांमध्ये 400 रुपयांची वाढ झाली. सोमवारी सोयाबीनला सरासरी 6 हजार 550 रुपये दर मिळाला आहे. जानेवारी महिन्यापासून दराला लागलेले ग्रहन आता सुटले आहे असेच चित्र असून सोयाबीनची आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कापसाच्या दरातही वाढ झाली आहे. यंदाचा विक्रमी दर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे. 11 हजार रुपये प्रति क्विंटलने कापसाची विक्री सुरु आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

साठवणूकीतले सोयाबीन बाजारात

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांनी दराला घेऊन सावध भूमिका घेतली होती. दर वाढले तरच सोयाबीनची विक्री अन्यथा साठवणूक हीच पध्दत कापसाबाबतही कायम होती. त्यामुळे दरात चढ-उतार झाला तरी शेतकरी आपल्या भूमिकेपासून दूर झाला नाही. म्हणूनच आता हंगाम संपत असताना सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे तर कापसाला विक्रमी दर मिळालेला आहे. सध्या समाधानकारक दर असल्याने आता साठवणूकीतले सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहे. त्यामुळेच लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 16 हजार पोत्यांची आवक झाली होती. असेच दर राहिले तर आवक वाढेल असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

हरभरा, तुरीचीही आवक वाढली

गेल्या आठ दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याचीही आवक सुरु झाली आहे. हरभऱ्याला 4 हजार 500 दर असतानाही आवक वाढत आहे. यंदा हरभरा क्षेत्रात मोठी वाढ झाली असून आवक वाढत राहिल्यास दर घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने हमीभाव केंद्र सुरु करावेत अशी मागणी आता होत आहे. हरभऱ्याला 5 हजार 400 रुपये हमीभाव ठरवून देण्यात आला आहे. सध्याच्या बाजारपेठेतील दराच्या विक्रीने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोमवारी हरभऱ्याची 19 हजार 500 पोत्यांची आवक झाली होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पहिल्या पेऱ्यातील हरभऱ्याची काढणी कामे सुरु झाली आहेत.

संबंधित बातम्या :

Summer Season: यंदा प्रायोगिक तत्त्वावर, आगामी काळात वाढणार उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, लातूर जिल्हा बॅंकेचा एक निर्णय अन् शेतीचा कायापालट, वाचा सविस्तर..!