ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन

| Updated on: Feb 12, 2022 | 1:49 PM

सध्या ऊसतोड आणि गाळप मोठ्या जोमात सुरु आहे. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्याकडे झुकला असून फडातील ऊस कारखान्यावर गेला म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. यानंतरचे व्यवस्थापनच भविष्यातील उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन
खोडवा उसाचे उत्पादन घेताना योग्य ते व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
Follow us on

लातूर : सध्या (Sugarcane Cane) ऊसतोड आणि गाळप मोठ्या जोमात सुरु आहे. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्याकडे झुकला असून फडातील ऊस कारखान्यावर गेला म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. यानंतरचे व्यवस्थापनच भविष्यातील (Increase in Production) उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे. ऊसतोड केल्यानंतर फडात जे (Cane Bagasse) पाचट असते त्याचेही नियोजन गरजेचे आहे. काळाच्या ओघात मराठवाड्यातील नदी पट्ट्यालगत ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, ऊसापासून निघणाऱ्या पाचटाचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते पण ते लक्षात येत नाही. त्यामुळे वेळीच पाचटाच्या व्यवस्थापनाची गरज असल्याचे मत कृषितज्ञ दीपक कच्छवे यांनी व्यक्त केले आहे. सध्या ऊसतोड झालेल्या क्षेत्रात पाचट थेट पेटवून दिले जात आहेत. त्यामुळे डॉ. दीपक कच्छवे हे ऊसाच्या फडात जाऊन याबाबत जनजागृती करीत आहेत.

पाचटाचे व्यवस्थापन करावे कसे?

ऊसापासून निघालेले पाचट एकतर जाळले जाते किंवा जनावरांच्या दावणीला तरी जाते. मात्र, पाचटाची कुट्टी करुन ते पाचट ऊस लागवड केलेल्या क्षेत्रावर अच्छादन करावे लागणार आहे. पाचट कुजवणाऱ्या कल्चरचाही वापर करुन जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे जमिनीत गारवा कायम राहतो. शिवाय जमिनीचा पोतही कायम टिकून राहतो. आता उन्हाळ्याच्या दिवासामध्ये लागलीच सिंचनाची गरज भासत नाही. शिवाय पाचट एकत्र करुन जनावरांना चारा म्हणूनही त्याचा वापर केला जातो. पाचटाच्या अच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचटाच्या अच्छादनामुळे ऊसात पुन्हा तणही लवकर येत नाही. जमिन सुपिकतेसाठी उपयुक्त गांडूळ जीवजंतूचे संवर्धन होते.

शेतकरी पाचटाचे काय करतो?

ऊसतोड झाली की, शेतकरी अडचणींचा पाढा वाचत थेट पाचटाला काडी लावतो. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या जीव जंतूचा नाश होतो. शिवाय वातावरणातही प्रदूषण होते. एवढेच नाही तर पाचट पेटवून दिल्याने वनसंपदेलाही धोका निर्माण होतो. मात्र, याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. ट्रक्टरच्या सहायाने मशिनद्वारे पाचटाची कुट्टी करुन घेतल्यानंतर ती कुट्टी कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सुफर फास्फेट खत टाकून पाणी द्यावे लागणार आहे. त्यानंतर यामध्ये छोट्या ट्रक्टरच्या सहायाने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट हे जमिनीत चांगले मिसळते.

संबंधित बातम्या :

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

काय सांगता? शास्त्रीय संगीत ऐकूण गायीच्या दूध उत्पादनात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज