Monsoon Rain : महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता! कोणते आहे ते 9 जिल्हे? जाणून घ्या

Maharashtra rain Update : कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापुरात पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Monsoon Rain : महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता! कोणते आहे ते 9 जिल्हे? जाणून घ्या
पावसाची खबरबात
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 8:49 AM

मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra News) दिलासा देणार बातमी आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावण्यास सुरुवातही केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापुरात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आलाय. तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबादसह नांदेडमध्येही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तिकडे भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. मॉन्सूनसाठी (Monsoon Rain) अनुकूल वातावरण तयार होऊ लागलंय. त्यामुळे केरळसह अंदमान निकोबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : भंडाऱ्यात पावसाची हजेरी..

भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलं. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री 12 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामात धान पिकांची लागवड केली असून धान पीक कापणीला आला आहे. त्यामुळे धान पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता! पाहा व्हिडीओ :

कुठे कुठे पाऊस होणार?

पश्चिम बंगालसह ईशान्येकडील सात राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरु झालाय. त्यामुळे पावसासाटी अनुकूल वातावरण तयार झालंय. अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात हे वारे दाखल होण्याचा अंदाज आहे. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस बरसेल, अशी शक्यता हवमान विभागानं वर्तवली आहे.

हिंगोलीतही रविवारी पावसाची हजेरी

तर इकडे आसाममध्ये नदील पूर येऊन एक पूल वाहून गेल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :