AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांधावर केलेली लागवड ठरली दुहेरी फायद्याची, उत्पन्न आणि संरक्षण पाहण्यासाठी लोकांची वर्दळ

मानोरा तालुक्यातील अजय ढोक हे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते करीत असतात. विशेष म्हणजे नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांचा विविध पूरस्काराने गौरवही झाला आहे.

बांधावर केलेली लागवड ठरली दुहेरी फायद्याची, उत्पन्न आणि संरक्षण पाहण्यासाठी लोकांची वर्दळ
lemon farmerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2023 | 10:43 AM
Share

वाशिम : महाराष्ट्रात (Maharashtra) शेतीच्या बांधावर सहसा कुणी पेरणी करीत नाही. मात्र शेताच्या चौफेर असणाऱ्या या मोकळया जागेवर वाशीम जिल्हयातील इंझोरी येथील अजय ढोक या प्रयोगशील शेतकऱ्याने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पैशातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi yojana) यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या स्मरणार्थ लिंबू लागवड (lemon cultivation) केली आहे. अजय ढोक यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. लिंबू फळांपासून उत्पन्न मिळण्याबरोबरच शेतीलाही नैसर्गिक काटेरी कुंपन मिळून शेतपीकांच वन्यप्राण्यांपासून सरंक्षण होत आहे. हा शेतीचा प्रयोग वाशिम जिल्ह्यात अनेकांना आवडला आहे. हा यशस्वी प्रयोग पाहायला शेतकरी तिथं हजरं राहत आहेत.

काटेरी वृक्षामुळे शेतीचेही वन्यप्राण्यांपासून संरक्षण

सततच्या वृक्षतोडीमुळे अलीकडील काळात वन्यजीव व मानवी संघर्ष वाढला आहे. पीक बहरात येताच वन्यप्राण्यांचे कळप पीक उद्धवस्त करीत आहेत. अनेकवेळा शेत पीकाचं संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपन लावणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी असलेल्या अजय ढोक यांनी आपल्या ५ एकर शेतीच्या बांधावर ११० लिंबाची झाडे लावली आहेत. लागवडीच्या दोन वर्षानंतर या झाडांना फळे येत असून लिंबाच्या विक्रीतून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळतं आहे. बांधावर लागवड केलेल्या लिंबाच्या काटेरी वृक्षामुळे शेतीचेही वन्यप्राण्यांपासून संरक्षण होत आहे.

नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांचा विविध पूरस्काराने गौरवही झाला

मानोरा तालुक्यातील अजय ढोक हे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते करीत असतात. विशेष म्हणजे नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांचा विविध पूरस्काराने गौरवही झाला आहे. अजय ढोक आणि त्यांच्या पत्नी पूजा ढोक हे दोघेही उच्चशिक्षित असून वडिलोपार्जित शेती करतात. तीळ पेरणीसाठी तयार केलेले पेरणी यंत्र, आरोग्यवर्धक अशा खपली गव्हाचे उत्पन्न त्यांनी आपल्या शेतात घेतले आहे.

कुंपनाबरोरचं बारमाही उत्पनाचा पर्याय शोधला

शेतीच्या बांधावरून अनेकवेळा दोन शेतकऱ्यांमध्ये छोटेमोठे वाद उद्भवत असतात. वर्षभर मोकळ्या असणाऱ्या शेतालगतच्या या जागेवर त्यांनी लिंबु लागवडीचा यशस्वी प्रयोग करून शेतीला नैसर्गिक कुंपनाबरोरच बारमाही उत्पनाचा पर्याय शोधला आहे. त्यांचा हा प्रयोग राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त असल्याने सर्व स्तरातून अजय ढोक यांच्या प्रयोगशीलतेचं कौतुक होत आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....