AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: नागपूरच्या रामटेकला तुफान गारपीट, पावसानं अर्धा तास झोडपलं, पुण्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास पूर्वमोसमी पाऊस झाला . Ramtek Nagpur Pune Rain

Video: नागपूरच्या रामटेकला तुफान गारपीट, पावसानं अर्धा तास झोडपलं, पुण्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज
नागपूरमध्ये झालेली गारपीट
| Updated on: May 11, 2021 | 11:21 AM
Share

मंबई: तापमानाबरोबरच आर्द्रतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने पुण्यात उकाडा वाढला असून, नागरिक हैराण झाल्याचे चित्र आहे. शहराच्या कमाल तापमानामध्ये जरी वाढ होत नसली, तरी किमान तापमान २५ अंशांच्या उंबरठ्यावर आल्याने उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आर्द्रतेचे प्रमाणही ७० टक्क्यांच्या पुढे गेल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ अनुपम काशयपी यांनी दिली आहे. पश्चिम मध्य प्रदेश ते कर्नाटक किनारपट्टीच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास पूर्वमोसमी पाऊस कोसळला. यावेळी काही ठिकाणी गारपीट झाली आहे. (Maharashtra Weather Report heavy rain fall at Ramtek Nagpur rain expected in Pune)

पुण्यात उकाडा वाढला

गेल्या दोन दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा जाणवत असून, किमान तापमानात होणारी वाढ आणि आर्द्रतेतील वाढ यामुळे उकाडा वाढत चालला असल्याचे निरीक्षण हवामान विभागाकडून नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून, तापमानातही वाढ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कमाल आणि किमान तापमानाच्या फरकामध्ये सातत्याने घट होत असल्याने उष्णतेत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

उकाड्याबरोबरच पुढील काही दिवस संध्याकाळच्या वेळी पुणेकरांना पावसाच्या हलक्या सरी अनुभवायला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम मध्य प्रदेश ते कर्नाटक किनारपट्टीच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, यामुळे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये गारपीट

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस कोसळला. या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. या दरम्यान काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. रामटेक शहरात ही अर्धा तास झालेल्या पावसात दहा मिनिटं मध्यम आकाराची गारपीट झाली. रामटेक आणि कोदमेंडी परिसरता झालेल्या पावसानं आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

Video: मराठवाड्यात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर

Rain Forecast | बहावा पिवळसर फुलांनी लगडला, दमदार पाऊस पडण्याचे संकेत

(Maharashtra Weather Report heavy rain fall at Ramtek Nagpur rain expected in Pune)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.