मनसेचा ‘काळा दसरा’ ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन

| Updated on: Oct 15, 2021 | 4:48 PM

सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून केवळ शेतकऱ्यांप्रतीच नाही तर सर्वच मुद्यांवर सरकार हे अपयशी ठरले असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्याात आला आहे. शेतकऱ्यांचे विविध मुद्दे घेऊन आज (शुक्रवारी) पुणे येथे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रावणरुपी आघाडी सरकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

मनसेचा काळा दसरा ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन
'मनसे'च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले
Follow us on

पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परस्थितीमध्ये सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून केवळ शेतकऱ्यांप्रतीच नाही तर सर्वच मुद्यांवर सरकार हे अपयशी ठरले असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्याात आला आहे. शेतकऱ्यांचे विविध मुद्दे घेऊन आज (शुक्रवारी) पुणे येथे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रावणरुपी आघाडी सरकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसानीची तीव्रता अधिक असतानाही राज्य सरकारने केवळ 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तर शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे भरीव मदत देण्याची मागणी यावेळी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. नुकसानभरपाईबरोबरच वेगवेगळे मुद्दे घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते.

सरसकट 50 हजाराची मदत करावी

पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. प्रशासनाने बांधावर जाऊन परस्थिती जाणून घेतली आहे. असे असताना पंचनामे, पाहणी ही औपचारिकता न करता थेट हेक्टरी 50 हजाराची सरसकट मदत करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. तर मराठवाड्यात ओला दुष्काळ करुन सर्वतोरपरी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

‘ई-पीक पाहणी’ पध्दत रद्द करावी

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीकाची नोंद करुन घेतली जात आहे. ही अत्याधुनिक पध्दत चांगली आहे. मात्र, याकरिता सरकारी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नाहीत. शिवाय अॅपमध्ये भरावयाची माहिती ही किचकट असून शेतकऱ्यांना याचे ज्ञान नाही. त्यामुळे ही माहिती भरणे अनिवार्यच असेल तर अनेक शेतकरी यापासून वंचित राहतील म्हणून ही ई-पीक पाहणी बंद करावी अन्यथा शासकिय यंत्रणा राबवून करण्याची मागणी मनसेने केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

नादुरुस्त रोहित्र दुरुस्ती करण्यासाठी 80% वीजबिल भरण्याची अट रद्द करावी, FRP चे तुकडे न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी FRP देण्यात यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, बाबू वागस्कर, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रुपालीताई ठोंबरे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारूडकर, जिल्हाध्यक्ष समीर थीगळे, जिल्हा अध्यक्ष विनोद जावळे इत्यादी उपस्थित होते. (MNS agitation in Pune over farmers’ issues, burning of symbolic statue)

संबंधित बातम्या :

पावसाळी कांदा सडायलाय ? मग अशी करा उपाययोजना

शेतातच ‘लाल चिखल’ होत असलेला टोमॅटो आज दरात ‘टॅाप’वर

एकीकडे खुल्या बाजाराचे पाऊल, दुसरीकडे तेलबियांच्या साठा मर्यादेचा निर्णय