पावसाळी कांदा पिवळा पडलायं ? मग अशी करा उपाययोजना

कांदा पीकावर सर्वाधिक परिणाम हा (Climate Effect) वातावरणात होत असतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे हाच यावरचा पर्याय असून रोगराईपासून बचाव करण्यासाठी फवारणीची कामेही वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या पावसाळी कांदा शेतामध्ये आहे. मात्र, या कांद्याची पात ही पिवळी पडण्याचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत..

पावसाळी कांदा पिवळा पडलायं ? मग अशी करा उपाययोजना
बदलत्या वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडली

लातूर : (Onion) कांदा हे नगदी पीक (cash crop ) असून अधिकतर शेतकरी कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कांद्याची लागवड करतात. मात्र, कांदा पीकावर सर्वाधिक परिणाम हा (Climate Effect) वातावरणात होत असतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे हाच यावरचा पर्याय असून रोगराईपासून बचाव करण्यासाठी फवारणीची कामेही वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या पावसाळी कांदा शेतामध्ये आहे. मात्र, या कांद्याची पात ही पिवळी पडण्याचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत..

यामुळे कांदा सडतो

1) कांद्याची लागवड करताना शक्यतो पात कापून लागवड केली जाते. त्यामुळे सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापलेल्या पातित पावसाचे पाणी हे साचले जाते. कालांतराने पातीचा तो भाग हळूहळू सडत जाउन शेवटी त्यावर बुरशी येते व रोप मरते.

(2) कांद्याची लागवड केली त्यावर रासायनिक खतांचा मारा सुरु होतो. हे खत मुळीजवळ पडल्यामुळे किंवा रोपातील दोन्ही पातीच्या मध्यभागी पडल्यामुळे पात सडते, रोप मरते. त्यामुळे कांदा लागवड करण्यापूर्वीच एकरी 4 बॅग सुपरफॉस्फेट व 1 बॅग पालाश देऊनच लागवड करावी तर कांदा लागवड केल्यावर 15 दिवस कोणतेच रासायनिक खत किंवा युरिया देऊ नये.

(3) कांद्याची लागवड केली की कमीत-कमी 15 दिवस खतांचा माराच करु नये. रोपाला युरियाचा अतिरिक्त वापर झाला की रोपांची ऊंची वाढते पण त्यामुळे पातीला पीळ पडतो.

(4) पाती वाकड्या झाल्यामुळे वाढ खुंटते. महाराष्ट्रात कांद्याची रोपे टाकल्या नंतर व लागवडीनंतर सातत्याने आर्द्रतायुक्त हवामान, पाऊस, धुके, धुवारी, धुईमूळे कांद्यावर रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

5) यंदा कांद्याच्या रोपातून अधिकचे पैसे कमवाण्याच्या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी रोप विक्रीसाठी बियाणे टाकले. मात्र, पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

काय आहे उपाययोजना ?

1) कांद्याची लागवड करताना रोपांची मुळी काही वेळ कार्बेनडीझम सारख्या बुरशी नाशकात बुडवून ठेवावी शिवाय रुटबुस्टरची ट्रीटमेंट करावी.

2) रोपाला आणि लागवड केलेल्या पिकाला 1 महिना युरियाची फवारणी ही करु नये. अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्याची साईडची मुळी वाढ होते पण मधली मुळी न वाढल्यामुळे रोपाला अन्न द्रव्ये ग्रहण करता येत नाहीत. त्यासाठी हायकार्ब, ह्युमिक ऍसिड व चिलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्यांची ड्रेंचिंग करावी. ज्या रोपाला पिळ पडल्यामुळे खराबी झाली आहेत ते उपटून त्याजागी नवीन रोप लावणेच फायद्याचे राहणार आहे.

3)कांद्याची लागवड होऊन एक महिना उलटलेला आहे. या कांद्याला किटक नाशकसोबत मायको सी सी 15 लिटर पंपाला 5/7 मिली वापरून वाढ नियंत्रणात ठेवावी.

4) ठिबकवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एकरी 250 मिली ह्युमिक ऍसिड आणि 500 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिमेंट 500 मिली सोडावे. (Pest infestation on onions, advice to farmers for proper measures)

संबंधित बातम्या :

शेतातच ‘लाल चिखल’ होत असलेला टोमॅटो आज दरात ‘टॅाप’वर

एकीकडे खुल्या बाजाराचे पाऊल, दुसरीकडे तेलबियांच्या साठा मर्यादेचा निर्णय

सोयाबीनच्या भावात तीन दिवसांमध्ये तीनशे रुपयांची घसरण, केंद्राच्या निर्णयाचा परिणाम शेतकऱ्यांवर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI