शेतकरी आणि शेतमजुराची दुर्घटना झाल्यास आर्थिक मदत, काय करावं लागणार? वाचा सविस्तर

| Updated on: Jun 06, 2021 | 5:17 AM

हरियाणा राज्य सरकारने अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी (Financial assistance) मुख्यमंत्री शेतकरी आणि शेतमजूर जीवन सुरक्षा योजना सुरू केली आहे.

शेतकरी आणि शेतमजुराची दुर्घटना झाल्यास आर्थिक मदत, काय करावं लागणार? वाचा सविस्तर
शेतकरी
Follow us on

नवी दिल्ली : शेतकरी (Farmers) आणि शेतमजूर दिवसरात्र शेतात राबत असतात. हे काम करत असताना 24 तास त्यांच्यावर अपघात होण्याचा धोका असतो. अशात जर एखाद्या कुटुंबातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा किंवा शेतमजुराचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावरच संकट कोसळतं. या कुटुंबाच्या उपजीविकेचाच प्रश्न तयार होतो. यावर उपाय म्हणून हरियाणा राज्य सरकारने अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी (Financial assistance) मुख्यमंत्री शेतकरी आणि शेतमजूर जीवन सुरक्षा योजना सुरू केली आहे (Mukhyamantri Kisan Khetihar mazdoor jiwan suraksha yojna scheme for farmers in accident by Hariyan Government).

या योजनेनुसार जर शेती काम करत असताना शेती, गाव, बाजार समिती अशा ठिकाणांहून येताना जाताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत बाजार समितीकडून पीडित कुटुंबाला आर्थिक स्वरुपात केली जाईल. त्यामुळेच तुम्ही जर शेतकरी किंवा शेतमजूर असाल तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे. या योजनेत पोल्ट्री फार्म आणि डेअरीचाही समावेश आहे.

आर्थिक मदत कधी मिळेल?

  • शेतीशी संबंधित अवजारासोबत काम करताना अपघात
  • धान्य करण्याच्या उपणेर (Thresher) चालवताना अपघात
  • पिकांवर किटनाशक (Pesticides) किंवा इतर औषधं मारताना मृत्यू
  • शेताला पाणी देण्याचं काम सुरु असताना वीजेचा धक्का किंवा शेताला लागलेल्या आगीत मृत्यू
  • शेतात काम करत असताना साप किंवा इतर विषारी प्राणी चावून मृत्यू

कोणत्या गोष्टीसाठी मदत मिळणार?

  • शेतीसंबंधित अपघातात मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची मदत.
  • पाठीचा मणका मोडल्यास किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2,50,000 रुपये.
  • शरीराच्या 2 अवयवांची मोडतोड झाल्यास किंवा गंभीर जखम झाल्यास 1,87,500 रुपये.
  • एका अवयवाची मोडतोड किंवा कायमस्वरुपीची जखम झाल्यास 1,25,000 रुपये.
  • हाताचं पूर्ण बोट कापलं गेलं तर 75 हजार रुपये.
  • काही प्रमाणात हाताचं बोट तुटलं तर 37 हजार रुपये.
  • ही सर्व मदत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

2 महिन्यात अर्ज करावा लागेल

हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीसाठी पोलीस रिपोर्ट आणि पोस्टमार्टम आवश्यक आहे. जखमी झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि अवयव तुटल्यास उर्वरित अवयवाचा फोटो जोडावा लागेल. अपघातानंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी 2 महिन्याच्या आत अर्ज बाजार समितीच्या सचिवाकडे जमा करावा लागेल. यासाठी शेतकऱ्याचं वय 10 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

हेही वाचा :

फळबागांसाठी सरकारची विशेष घोषणा, 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ 2 जिल्ह्यांचा समावेश

“दूध दर पाडणाऱ्या दूध कंपन्यांचे ऑडिट करून शेतकऱ्यांची लूट थांबवा”, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

देशातील शेतकऱ्यांना यूनिक किसान आयडी क्रमांक मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Mukhyamantri Kisan Khetihar mazdoor jiwan suraksha yojna scheme for farmers in accident by Hariyan Government