दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल

| Updated on: Mar 07, 2022 | 4:26 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही शेतकऱ्यांसदर्भातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा (Farmer Loan) मुद्दा लावून धरला जात आहे.

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल
नाना पटोलेंकडून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly Session) विविध मुद्दे गाजत असताना. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. त्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही शेतकऱ्यांसदर्भातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा (Farmer Loan) मुद्दा लावून धरला जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात 2016 साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतू या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का ? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसात झालेल्या नुकसानीचा विचार करता सरकारकडून कर्जमाफी करण्यात आली, मात्र या कर्जमाफीपासून हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत.

नाना पटोलेंची मागणी काय?

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनामधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा केली होती. तसेच ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचाही पर्याय दिला होता. यातूनही काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबद्दल काही तक्रारी नाहीत आणि या कर्जमाफी योजनेचे उदिष्ट्य सरकार पूर्ण करेल असे उत्तर दिले.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेकदा शेतकऱ्याचा माल शेतात सडला आहे. त्यातच दुष्काळ,अतिवृष्टी आणि पाचवीला पुजलेला अवकाळी यामुळे आधीच बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. सरकारने त्यावर तोडगा म्हणून काही अटी शर्तीसह कर्जमाफी केली. मात्र त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, हाच मुद्दा आज पटेलेंनी उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधलं आहे.

महाविकास आघाडीचा शिवसेनेला ठेंगा, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे!

नितेश राणे काय म्हणाले माहीत नाही, मी भाजपचा शिपाई आणि हिंदुत्ववादी नक्कीच : देवेंद्र फडणवीस

फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू