AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्च्या तेलाच्या किंमती भडकताच निर्देशांकात पडझड

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 130 डॉलरच्या घरात गेल्याने निर्देशांक 1500 अंशांनी घसरला

कच्च्या तेलाच्या किंमती भडकताच निर्देशांकात पडझड
कच्च्या तेलाची आयात वाढली
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने शेअर बाजाराने (Share Market Update) आज मोठ्या घसरणीसह खाते उघडले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांकाची घसरगुंडी उडाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांक 1161अंकांनी घसरुन 53172 अंकावर उघडला. तर निफ्टीने 15868 अंकावर खाते उघडले. एमसीएक्सवरील (MXC Crude)कच्च्या तेल सर्वोच्च पातळीवर(Upper Circuit) स्थिरावले आहे. 21 मार्च रोजी डिलिव्हरीसाठी असलेले कच्चे तेल एमसीएक्सवर 772 रुपयांनी (9 टक्क्यांची वाढ) वाढून 9,352 रुपयांवर पोहोचले. ही आजची सर्वोच्च पातळी आहे. 19 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठीचे तेल 751 रुपयांनी (8.99%) वाढून 9,106 रुपयांवर पोहोचले. अप्पर सर्किट लागल्यानंतर शेअर बाजारातील व्यापार ठप्प झाला आहे. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 52819 या पातळीवर 1513 अंकांनी घसरला व निफ्टी 413 अंकांनी घसरून 15832 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत होता.

सध्या सेन्सेक्सच्या टॉप-30 मधील 29 शेअर धोक्याच्या पातळीवर असून केवळ टाटा स्टीलचे समभाग वधारले आहेत. मारुती, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्स या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी बँक, ऑटो इंडेक्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि रियल्टी यांचा आजच्या घसरणीत मोठा वाटा आहे. यांच्या निर्देशांकात 4 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे.

तेल पुरवठ्यात खोडा

रशिया-युक्रेन युद्धाने आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलून गेले आहे. त्याचा सदृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. अमेरिका, युरोप आणि मित्रराष्ट्रांनी रुसकडून तेल खरेदीला प्रतिबंध घातल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीच्या वाढल्या आहेत. गेल्या 14 वर्षांतील या सर्वोच्च किंमती आहेत. 2008 मध्ये किंमती 130 डॉलरवर पोहचल्या होत्या. त्यानंतर आता किंमती गगनाला भिडल्या आहेत. राष्ट्रपती जो बाईडन यांनी ईराणवरील प्रतिबंध हटवण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे चर्चा सुरु आहे. पण अमेरिकेसह ज्या सहा राष्ट्रांनी प्रतिबंध लादले आहेत, त्या सर्वांनी प्रतिबंध हटवले तरच चर्चेला येऊ असा निरोप ईराणने पाठविला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी अमेरिका आणि मित्रराष्ट्र रशिया सोबत तेल आणि नैसर्गिक गॅसच्या आयातीवरील प्रतिबंध हटविण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.

रशिया तेल उत्पादनात अग्रेसर

रशिया तेल उत्पादक देशात अग्रेसर आहे. रशिया दररोज 5-6 दशलक्ष बॅरल तेल निर्यात करते. तेल निर्यातीवरील निर्बंधांमुळे सध्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याशिवाय ओपेक+ देशही तेल उत्पादन वाढवण्याबाबत विचार करत नसल्याने पुरवठ्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे.

आशियाई बाजाराला फटका

इतर आशियाई बाजारांमध्ये हाँगकाँग, शांघाय आणि टोकियो हे शेअर बाजार धोक्याच्या पातळीवर होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड 8.84 टक्क्यांनी वाढून 128.6 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ 7,631.02 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

संबंधित बातम्या :

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्समध्ये तब्बल 1375 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका

कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी

EPFO | टीडीएस जमा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येते? काय आहे नवीन नियम?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.