AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचा शिवसेनेला ठेंगा, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे!

चेअरमनपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे विजयी झाले. महाविकास आघाडी जिल्हा एकत्र भाजप विरुद्ध एकत्र लढली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांना प्रत्येकी 5 जागावर विजय मिळाला होता मात्र शिवसेनेच्या पदरात काही पडले नाही.

महाविकास आघाडीचा शिवसेनेला ठेंगा, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे!
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बापुराव पाटील आणि उपाध्यक्षपदी मधुमकर मोटे यांची निवड झाली.
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 3:59 PM
Share

उस्मानाबाद ग्रामीण भागात शिवसेनेचे प्रभुत्व आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Osmanabad District Bank) निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट बांधली. निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे 5-5 संचालक निवडून आले. मात्र ऐन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना तोंडावर आपटली. आज जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक महाविकास आघाडीत अखेर फुट पडली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ती महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेणारी शिवसेना मात्र एकटी पडली. शिवसेनेचे 5 संचालक निवडून आले होते. त्यापैकी एक संचालक भूम परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या गटातून फुटून काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला. 11 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी विजयी झाले.

प्राबल्य असूनही शिवसेनेला भोपळा

खासदार ओमराजे निंबाळकर व संपर्क प्रमुख आमदार तानाजीराव सावंत यांना मोठा दणका मानला जात आहे. ग्रामीण भागात सहकारमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असतानाही जिल्हा बँकेत काही हाती लागले नाही. शिवसेनेने भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली, भाजप व आमदार राणा यांचा पराभव केला मात्र विजयाचा आनंदोत्सव शिवसेनेला जास्त काळ टिकवता आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र आल्याने शिवसेना तोंडावर पडली.

अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्षपदी मधुकर मोटे

चेअरमनपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे विजयी झाले. महाविकास आघाडी जिल्हा एकत्र भाजप विरुद्ध एकत्र लढली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांना प्रत्येकी 5 जागावर विजय मिळाला होता मात्र शिवसेनेच्या पदरात काही पडले नाही. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी आजवर 11 चेअरमन झाले त्यात मधुकरराव चव्हाण, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील,विक्रम दगडोबा पडवळ,महारुद्र आनंदराव मोटे, लक्ष्मण आनंदराव मोटे,शिवाजीराव प्रतापराव चालूक्य,पवनराजे निंबाळकर, बापूराव माधवराव पाटील, पंडितराव प्रलहादराव टेकाळे, सुरेश बिराजदार हे होते त्यात मधुकरराव चव्हाण, विक्रम पडवळ,महारुद्र मोटे,बापूराव पाटील या 5 जणांनी दोन वेळेस चेअरमनपद भीषविले. पवनराजे यांच्या नंतर शिवाजीराव चालूक्य यांनी 5 वर्ष 10 महिने चेअरमनपदी होते. बापूराव पाटील यांनी 2 वेळेस 4 वर्ष 9 महिने पद भूषविले. सर्वात कमी काळ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा प्रतिष्ठेचा होता. आजवर जिल्हा बँकेच्या काळात 17 व्हॉइस चेअरमन झाले त्यात सर्वाधिक काळ हा भाजपचे नेते पाटील चिंतामणराव शिंदे यांचा 19 मे 2005 ते आजवरचा असा 6 वर्ष 9 महिने असा आहे.उपाध्यक्ष म्हणून विनायकराव पाटील, विक्रम पडवळ,अशोकराव इंद्रजीतराव जवळगे,नानासाहेब बळीराम जाधवर, शिवाजीराव चालूक्य,शिवाजी गाढवे, सुरेश बिराजदार,ऍड सुभाषराव मोरे, शिवाजी गणपतराव पाटील, पंडितराव प्रल्हादराव टेकाळे, राहुल काकासाहेब पाटील, नारायण किसनराव समुद्रे, संजय गौरीशंकर देशमुख व कैलास शिंदे यांचा समावेश आहे.

इतर बातम्या-

नितेश राणे काय म्हणाले माहीत नाही, मी भाजपचा शिपाई आणि हिंदुत्ववादी नक्कीच : देवेंद्र फडणवीस

इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.