शेतीच्या नुकसानीचं नेमकं कारणं शोधलं, शेतकऱ्यांसाठी तरुण संशोधकाची किफायतशीर हवामान केंद्राची निर्मिती

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानावर आधारित सुधारित शेतीकडे वळू लागलेत. त्यासाठी अगदी किफायतशीर आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा माफक दरात वेदर स्टेशन्स अर्थात अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र पराग नार्वेकर यांनी विकसित केलेत.

शेतीच्या नुकसानीचं नेमकं कारणं शोधलं, शेतकऱ्यांसाठी तरुण संशोधकाची किफायतशीर हवामान केंद्राची निर्मिती
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 3:48 PM

नाशिक: नाशकात चक्क नासाच्या सॅटेलाइटच्या मदतीनं शेती केली जातेय. नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानावर आधारित सुधारित शेतीकडे वळू लागलेत. त्यासाठी अगदी किफायतशीर आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा माफक दरात वेदर स्टेशन्स अर्थात अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र पराग नार्वेकर यांनी विकसित केलेत.

अत्याधुनिक स्वंयचलित हवामा केंद्राची उभारणी

गेल्या काही वर्षांपासून देशात निसर्गाचा लहरीपणा वाढलाय. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि गारपीट होते. बेभरवशाचं हवामान आणि हवामान बदलाचा मोठा फटका सध्या शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जात असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. मात्र, शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना मिळाली, तर नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर यांनी सह्याद्री फार्मच्या मदतीनं शेतकऱ्यांना परवडतील, अशी अत्याधुनिक आणि स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केलीत, असं सह्याद्री फार्म्सचे कृषीतज्ज्ञ सचिन वाळुंज यांनी सांगितलं.

किफायतशीर दरात हवामान केंद्रांची निर्मिती

अत्याधुनिक आणि सामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक आवाक्यात असतील, अशी तीन प्रकारच्या हवामान केंद्रांची निर्मिती डॉ. पराग नार्वेकर यांनी केलीय. डॉ. नार्वेकर यांनी नाशिकमध्येच हवामान केंद्राला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करून हवामान केंद्र अगदी सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात म्हणजेच तब्बल 10 हजार ते 60 रुपयात उपलब्ध करून दिलीयत.

डॉ. पराग नार्वेकर, माजी संशोधक नासा यांनी या अत्याधुनिक हवामान केंद्रांमुळे माती, पाणी, पीक व्यवस्थापन आणि पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर आणि अचूक करण्यास मदत मिळालीय असं सांगितलं. अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह आणि डिजीटल प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रिसिजन फार्मिंग अर्थात काटेकोर शेती करता येणं शक्य झालंय.

शेतकरी सुयोग सोमवंशी यांनी या हवामान केंद्रांमुळे वाऱ्याचा वेग, दिशा, प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्‍यक सूर्यकिरणे, बाष्पीभवन, हवेचा दाब याची देखील माहिती मिळते, असं सांगितलं. तब्बल पाच बाय पाच किलोमीटर परिघापर्यंत याचा वापर करता येतो. त्यामुळे व्यापक क्षेत्रासाठी हवामान अंदाज देण्याच्या अनुषंगानेही याचा वापर करता येणं शक्य असल्यानं एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणारय. या वेदर स्टेशनचा उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 40 केंद्र कार्यान्वित झाली असून तब्बल 400 शेतकऱ्यांनी स्वतःच्या वैयक्तीक हवामान केंद्रासाठी मागणी नोंदवलीय.

इतर बातम्या :

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6 हजार पती-पत्नी दोघांनाही मिळतात का? नेमका नियम काय?

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

Nasa former researcher Parag Narvekar set up affordable Weather Forecast centers for farmers