मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!

| Updated on: Dec 27, 2021 | 12:53 PM

कोरोना बाबतच्या नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईलाही सुरवात झाली आहे. मात्र, मुंबई येथील भायखळा भाजीपाला व्यापारी संघाने असा निर्णय घेतला आहे की तुम्हाला मास्क घातल्यशिवाय अत्यावश्यक असलेली भाजी देखील खरेदी करता येणार नाही. हो, मुंबईतील भायखळा येथील भाजी मंडईमध्ये मास्क घातले तरच भाजीपाला दिला जात आहे.

मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!
भायखळा येथील भाजीमंडईमध्ये मास्क असेल तरच भाजीपाला दिला जात आहे. दुकानांसमोर असे फलक लावण्यात आले आहेत.
Follow us on

मुंबई : राज्यात ‘ओमिक्रॉन’चे संकट अधिकच गडद होत आहे. त्या अनुशंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना (Government) सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहेतच पण (Mask) मास्क हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईलाही सुरवात झाली आहे. मात्र, मुंबई येथील (Bhaykhala vegetable market) भायखळा भाजीपाला व्यापारी संघाने असा निर्णय घेतला आहे की तुम्हाला मास्क घातल्यशिवाय अत्यावश्यक असलेली भाजी देखील खरेदी करता येणार नाही. हो, मुंबईतील भायखळा येथील भाजी मंडईमध्ये मास्क घातले तरच भाजीपाला दिला जात आहे. या निर्णयामुळे ग्राहकही सुरक्षित राहणार आहेत तर विक्रेत्यांनाही कोणताही संकोच राहणार नसल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाजीमंडईतील दुकानांसमोर मास्क नाही, भाजी नाही असे फलक दिसत आहेत.

किरकोळ विक्रत्यांचीही गर्दी

भायखळा येथील भाजीमंडईमध्ये पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत किरकोळ विक्रेत्येही भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे ठोक विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. मुंबई शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे ही खबरदारी घेतली जात असून उद्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मार्केट बंद ठेवण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेतला आहे. ही भाजी मंडई 160 वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे.

कसा झाला निर्णय?

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील व्यापाऱ्यांनी थेट निर्णय न घेता आगोदर भाजीमंडईमध्ये सर्वे केला. यामध्ये त्यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांनी लहान-मोठे व्यापारी यांना वेळोवेळी सुचनाही केल्या मात्र, याकडे दुकानदार आणि ग्राहकांचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर ज्याच्या तोंडला मास्क त्यालाच भाजीपाला हा निर्णय घेण्यात आला. आता हा निर्णय सर्वांनाच मान्य झाला आहे. शिवाय प्रत्येकजण मास्क घालूनच मंडईमध्ये दाखल होत आहे. ग्राहक आणि दुकानदार यांच्यासाठीच हा निर्णय झाल्याने आता निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

ग्राहकांचे काय आहे म्हणने ?

भायखळा ही खूप जुनी भाजीमंडई आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजी खरेदीसाठी सातत्याने ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. या निर्णयाच्या सुरवातीला काही जणांनी विरोध केला मात्र, आता ग्राहकांना सवयही झाली आहे. शिवाय या निर्णयाचे महत्वही कळाले आहे. कारण आता दिवसागणीस ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे वाढता धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना केव्हाही चांगलीच असे म्हणत ग्राहकही आता मास्क घालूनच भाजीमंडईत प्रवेश करीत आहेत. एवढेच नाही तर भायखळा प्रमाणेच इतर भाजीमंडईमध्येही असेच नियम असायला पाहिजे हेच सर्वसामान्य नागरिकांचे म्हणने आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण

ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. महाराष्ट्रातील आकडा चिंताजनक आहे. जिल्हानिहाय नियमावली जारी करण्यात आली आहे. तर रविवारी नव्याने 31 ओमिक्रॉन रुग्णांची भर पडलेली आहे. ओमिक्रॉनची भीती लक्षात घेऊन राज्य सरकारांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि सर्व निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रात महापालिकेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे.

संबंधित बातम्या :

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

हळद शेतीमाल नाही तर मग काय? सांगलीतील व्यापाऱ्यांचा प्रश्न, आक्रमक पवित्र्यानंतर निघणार का तोडगा..!

Cotton Rate : सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही अवस्था, शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय