पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

रब्बीच्या पेरणी दरम्यान आणि आता पीके बहरात असताना पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहत आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली तरच रब्बी हंगामातील पीके बहरत राहणार आहेत.

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 11:54 AM

लातूर : रब्बीच्या पेरणी दरम्यान आणि आता पीके बहरात असताना पुन्हा (Untimey Rain) अवकाळी पावसाचे संकट उभे राहत आहे. हवामान विभागाने डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली तरच (Rabi season) रब्बी हंगामातील पीके बहरत राहणार आहेत. अन्यथा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा आणि गव्हावर होणार आहे. त्यामुळे अळीचा आणि वाढत्या बुरशीचा बंदोबस्त हा शेतकऱ्यांना करावाच लागणार आहे. शिवाय खरीप हंगामातील तूर आणि कापसाचीही काढणी करुन साठवणूक महत्वाची राहणार आहे.

गव्हावर तांबोरा तर उर्वरीत पिकांना अळीचा धोका

पावसामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे गहू या रब्बी हंगामातील मुख्य पिकावर तांबोऱ्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण 2:1 ठेवावे. पिकास पाणी देताना बेताने व गरजेपुरतेच द्यावे. रोगाचे लक्षण दिसून येताच 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम- 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच अशाप्रकारे फवारणी केली तर त्याचा परिणाम होणार आहे.

बुरशीनाशकाची फवारणी

रब्बी हंगामातील पिकांच्या बुडाशी पाणी साचून राहिले किंवा वातावरणात दमटपणा आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुरशीनाशक म्हणून अॅडक्झेर हे औषध प्रभावी राहणार आहे. 15 लिटर पंपासाठी 30 मिली औषेध पाण्यात मिसळावे लागणार आहे. या मिश्रणात एक एकरामधील फवारणी होणार आहे. तर बीएसएफ चे ओपेरा हे एक बुरशीनाशक महत्वाचे ठरणार आहे. याचे प्रमाण देखील अॅडेक्झेर प्रमाणेच ठेवावे लागणार आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत असताना पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी आणि नंतरचे चार दिवस पिकांची काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे.

कापूस वेचणी अन् साठवणूक महत्वाची

खरीप हंगामातील कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात आहे. अधिकतर प्रमाणात काढणी झाली आहे. मात्र, फरदडचे उत्पादन काही शेतकरी हे घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा न करता शेतकऱ्यांनी फरदड कापूस काढला पाहिजे तर वेचलेल्या कापसाची योग्य ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. वेचणी झाल्यावर लगेच कापसाची झाडे ही शेताबाहेर काढून टाकावीत. तरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे. या बाबी क्षुल्लक असल्या तरी थेट पिकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

हळद शेतीमाल नाही तर मग काय? सांगलीतील व्यापाऱ्यांचा प्रश्न, आक्रमक पवित्र्यानंतर निघणार का तोडगा..!

Cotton Rate : सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही अवस्था, शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

E-Shram Card : नाव नोंदणीला अडचण, एका फोनमध्ये प्रश्न मार्गी, अशी आहे प्रक्रिया..!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.