दुष्काळातही संधी… एकदा लावा आणि 3 वर्षांत भरघोस मिळवा हिरवा चारा
Drought Fodder Shortage: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पाण्यासोबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. अशावेळी लसूणघास शेतकऱ्यांसाठी चांगला चारा ठरू शकतो. ज्यांच्याकडे थोडंबहुत पाणी आहे. त्या शेतकऱ्यांना याचं उत्पादन घेता येईल.

Animal Fodder: महाराष्ट्रासह देसातील अनेक राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पाण्यासोबतच गुरांच्या चाऱ्याचा ही प्रश्न बिकट झाला आहे. गाय-म्हैस, बैल असणार्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. चाऱ्याचे दरही वधारले आहेत. चारा मिळत नसल्याने काहींनी गुरांच्या बाजारात जनावरं नेली तर त्यांना कमी किंमत मिळत आहे. शेतातील विहीर अथवा बोअरवेलला थोडेबहुत पाणी येत असेल तर लसूणघास, मेथी गवत हा शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचा चांगला पर्याय ठरू शकतो. लसूण घास लावल्यावर त्याची अनेकदा कापणी होते. यामुळे चाऱ्याची समस्या कमी होते. जनावरांना हिरवा ताजा आणि पौष्टीक चारा मिळतो. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते.
खरीप हंगामात पावसाने 60 दिवस डोळे वटारले. यामुळे या हंगामात उत्पादन निम्म्यावर आणि काही ठिकाणी शून्यावर आले आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या दुसरा आठवडा सुरू झाला आहे. हा कालावधी लसूण घास, मेथी गवतासाठी चांगला मानल्या जातो. या घासाची लागवड डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत करणे चांगले मानले जाते. पण सध्याचा काळ अनुकूल मानल्या जातो. ICAR च्या कृषीतज्ज्ञांनी सुद्धा हा काळ या घासाच्या लागवडीसाठी योग्य सांगितला आहे.
लसूण गवतासाठी शेतीची मशागत
मेथी गवताच्या लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. ती समतल, एकसारखी असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतातील एक पट्टा तयार करता येतो. या गवताला जास्त पाणी लागत नाही. जास्त पाणी असल्यास ही घास प्रभावित होते. वाढ खुंटते. शेण, नैसर्गिक खत अथवा पंचगव्याचा वापर करून जमिनीचा पोत सुधारून लागवड केल्यास ही घास जोमाने येते.
एका ओळीत लावल्यास अधिक फायदा
लसूणघासचे बी एकाच ओळीत टाकल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. बी सुद्धा कमी लागते. ओळीत पेरणीसाठी प्रति हेक्टर साधारणपणे 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे मानले जाते. तर या ओळींमध्ये कमीत कमी 25 ते 30 सेमीचे अंतर असणे आवश्यक आहे. हे बी अधिक खोलवर टाकू नका. कारण ते जळू शकते. त्याच्या वाढीसाठी योग्य आर्द्रता आवश्यक आहे.
60 दिवसात पहिली कापणी
योग्य लागवडीनंतर 60 दिवसात या गवताची पहिली कापणी करता येते. त्यानंतर हवामान आणि योग्य पाणी दिल्यास जवळपास 25-35 दिवसाच्या अंतराने कापणी करता येते. लसूण घासाच्या काही जातीत सहा ते सात वेळा कापणी होऊन 700-800 क्विंटल हिरवा चारा प्रति हेक्टर मिळू शकतो.