पाझर तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

| Updated on: Sep 08, 2021 | 10:11 PM

एक ना अनेक संकटाचा सामना केल्यानंतर आता पिक पदरात पडेल असे चित्र झाले पण मुसळधार पावसामुळे शेताजवळचाच पाझरतलाव फुटला आणि शेतात पाणी शिरल्याने अवघ्या काही वेळात होत्याचं नव्हतं झाल. ही कथा आहे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावच्या अल्पभुधारक शेतकऱ्याची.

पाझर तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं
पाझर तलावाचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातुर : सर्वकाही अलबेल होतं. (Kharif) पेरणीपासून खरिपाच पिक जोमात येण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. खुरपणी, कोळपणी, फवारणी यामध्ये कष्ट होतं पण तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची जपवणूक केली. एक ना अनेक संकटाचा सामना केल्यानंतर आता पिक पदरात पडेल असे चित्र झाले पण मुसळधार पावसामुळे शेताजवळचाच पाझरतलाव फुटला आणि शेतात पाणी शिरल्याने अवघ्या काही वेळात होत्याचं नव्हतं झाल. ही कथा आहे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावच्या अल्पभुधारक शेतकऱ्याची..(pazar-lake-burst-in-ahamadpur-and-it-didnt-happen)
खरिपात दरवर्षी नुकसान हे ठरलेलं असलं तरी नव्या उमेदीनं शेतकरी चाढ्यावर मूठ धरतोच. अगदी त्याप्रमाणेच अहमदपूर तालु्क्यातील चिखली गावच्या निवृत्ती तांदळे हे अल्पभुधारक शेतकऱ्याने खरिपातील पिकाला घेऊन अनेक स्वप्नही पाहिली होती. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक. याच पिकाच्या उत्पादनातून कुटुंब स्वावलंबी बनविण्याचा चंगच तांदळे यांनी केला होता. (Soyabin) या तीन एकरातील सोयाबीनच्या पेरणी आणि मशागतीसाठी त्यांनी 45 हजार रुपये खर्ची केले होते. काढणीला महिन्याभराचा कालावधी असतानाच पावसाची अवकृपा होण्यास सुरवात झाली होती. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतं होता. यातूनही सोयाबीन पिक सावरेल असा विश्वास निवृत्ती तांदळे यांना होता परंतु, गाव शेजारी असलेला तलाव फुटला आणि वाहत्या पाण्याबरोबर सोयाबीन तर वाहुन गेलेच सोबत निवृत्ती यांनी पाहिलेली स्वप्नही भंग पावले. चार दिवसापुर्वी जोमात बहरत असलेलं सोयाबीनची आज वहीवाट झालेले पाहण्याची नामुष्की आज तांदळे यांच्या कुटुंबीयावर आली आहे. तीन एकरातील सोयाबीनवर तांदळे यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होते. मात्र, वरुणराजाची अवकृपा झाली आणि जगावं कसं असा सवाल आता त्यांच्यासमोर उभा आहे. (pazar-lake-burst-in-ahamadpur-and-it-didnt-happen)

आर्थिक नुकसान आणि निष्फळ प्रयत्न

गतवर्षी खरिपात नुकसान होऊनही यंदा त्याची कसर काढायची म्हणून निवृत्ती तांदळे यांनी तीन एकरात 45 हजार रुपये खर्ची केले होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी सोयाबीनचा सांभाळ केला होता. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे तांदळे यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सोयाबीनची झालेली चित्तरकथा सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.

सध्याची अतिवृष्टी आणि भविष्यातील पाणी टंचाई

अहमदपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या चिखली गावात पाणीटंचाई ही कायमचीच. यंदा तर पावसामुळे दुहेरी नुकसान झाले आहे. सध्या अतिवृष्टामुळे खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण पाझर तलावच वाहून गेल्याने आगामी काळातील पाणी टंचाईचाही प्रश्न भेडसावू लागला आहे.

संबंधित इतर बातम्या :

अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या

पावसाच्या सरींनी निसर्ग खुणावतोय, औरंगाबादमध्ये ट्रेकिंगसाठी नेमके कुठे जाणार, जाणून घ्या महत्त्वाची ठिकाणं….

मराठवाड्यात पावसाचा महाप्रताप, लातूर-नांदेड-परभणी-बीडमधले धरणं फुल्ल, काही ठिकाणी कित्येक वर्षात पहिल्यांदाच पूर

(pazar-lake-burst-in-ahamadpur-and-it-didnt-happen)