पावसाच्या सरींनी निसर्ग खुणावतोय, औरंगाबादमध्ये ट्रेकिंगसाठी नेमके कुठे जाणार, जाणून घ्या महत्त्वाची ठिकाणं….

अवघं औरंगाबाद शहर डोळ्यात साठवायचं असेल तर कडेठाण पठारासारखा डोंगर आहे. तर प्राचीन मंदिरं, शिल्प, वास्तू पहायच्या असतील अनेक ऐतिहासिक वास्तू- मंदिरं अजूनही उत्साही-अभ्यासू पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसाच्या सरींनी निसर्ग खुणावतोय, औरंगाबादमध्ये ट्रेकिंगसाठी नेमके कुठे जाणार, जाणून घ्या महत्त्वाची ठिकाणं....
निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शुलिभंजन येथे जाता येईल.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 6:31 PM

औरंगाबाद: परतीच्या पावसानं औरंगाबादकरांना चांगलंच धुतलं असलं तरीही शहर आणि सभोवतालचा निसर्ग आता निसर्गप्रेमींना खुणावतोय. निसर्ग भ्रमंती करणारे, उत्साही पर्यटक, अभ्यासक, ट्रेकर्स, तरुण मित्रमंडळी आता ट्रेकिंगला जाण्याचाही प्लॅन करत आहेत. अजिंठा, वेरुळ, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबादचा किल्ला, गोगाबाबा टेकडी, साई टेकडी, बीबी का मकबरा अशी प्रसिद्ध ठिकाणं (Toutist Places in Aurangabad)तर आहेतच. मात्र काही कमी गर्दी होणारी, लहान-मोठी ठिकाणंही आहेत. पावसाळ्याने निसर्गाची वाढवलेली शोभा कुठे अधिक जवळून पाहता येईल आणि काही प्राचीन, ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट देता येईल, अशा काही स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे-

कठेपठार आणि खंडोबाचं मंदिर

शहरातील जुनं खंडोबाचं मंदिर असलेलं कडेपठार. या डोंगरावर जाण्यासाठी सातारा तांडा, एसआरपी कँपकडून तसेच बीड बायपास रोडवरूनही रस्ता आहे. अवघं औरंगाबाद शहर एका नजरेत डोळ्यात साठवून घ्यायचं असेल तर कडेपठारावर अवश्य जायला हवं. डोंगरावर एक बारव आणि एक तलावही आहे. हिरवाईनं नटलेल्या डोंगरावर झाडाझुडपातून वाट काढत जायला रमणीय वाटते. वाटेत एक लहानशी देवीची गुहा लागते. याठिकाणी फोटोही सुंदर काढता येतील. सकालच्या वेळात गेला तर धुक्यांनी भारलेलं वातावरण, मध्येच हलक्या पावसाच्या सरी आणि डोंगरमाथ्यावरचं खुणावणारं प्राचीन मंदिर असं लोभस वातावरण अनुभवायला मिळेल.

शुलीभंजन

खुलताबादहून जवळ असलेले हे दत्ताचे मंदिर. अगदी साधं पण मनाला शांतता देणारं हे मंदिर. पावसाळ्यात सकाळीच पर्यटनासाठी निघालात तर शुलीभंजन हा स्पॉट खूप आनंद देणारा ठरू शकतो. सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. या काळात अवघा डोंगर आणि मंदिर ढगांनी वेढलेला दिसतो. लांबच लांब डोंगररांगा आणि डोंगरावरून खाली डोकावून पाहिल्यास लहान लहान गावं, लहान तळे, तलाव अन् खुला आसमंत, हे वातावरण मन प्रसन्न करतं. मंदिरात एक मोठी शिळा असून तिच्यावर दगडाने वाजवलं तर सप्तसूर निघतात. मंदिर परिसरातील तलाव आणि चिखल तुडवताना जागोजागी उमललेली रानफुलंही आपलं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात एक ट्रिप शुलिभंजनला अवश्य प्लॅन करू शकता.

हिमायत बाग

शहराची शान असलेला सर्वात मोठा ग्रीन झोन आाणि वास्तू कलेचा अप्रतिम नमूना म्हणजे हिमायत बाग. औरंगाबादचे मूळ शिल्पकार मलिकंबर यांच्या काळात म्हणजेच चारशे वर्षे आधी वसलेले शहरातील मुघल गार्डन म्हणजेच हिमायत बाग. मुघल सम्राट बादशहा औरंगजेब याची ही आवडती बाग होती. त्यानेच त्या काळात येथे अनेक आंब्याच्या जाती लावल्या. या परिसरात आठ विहिरी असून तेथील शक्कर बावडीला वर्षभर पाणी असते. दररोज शेकडो लोक येथे फिरायला येतात. बागेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला मोर आणि इतर पक्षांचा अधीवास. इथं मोर, मोहोळ घार, घुबड, स्वर्गीय नर्तक, नाचरा, हळद्या, धनेश, पोपट, हरियाल आदी 128 प्रकारचे पक्षी आढळतात. पण सध्या पावसाळी वातावरणात पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहयचा असल्यास हिमायत बागेत गर्दी वाढायच्या आत म्हणजेच सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पोहोचायलाच पाहिजे. एकदा पर्यटकांनी गर्दी वाढू लागली की मोरांचे दर्शन विरळ होते. मग आपल्याला केवळ मोरांच्या आवाजावरच समाधान मानावे लागते.

औरंगाबाद लेण्या

बीबी का मकबर्‍याच्या पाठिमागे जाणारा रस्ता पुढे औरंगाबाद लेण्यांकडे जातो. मकबर्‍याला जाणारे खुप आहेत पण औरंगाबाद लेण्यांकडे फारसे कुणी फिरकत नाही. उजव्या बाजूच्या लेण्यात आम्रपालीचे अप्रतिम असे शिल्प आहे. गायन वादन नृत्य असा एकत्रित भारतातील पहिला संदर्भ याच लेण्यात आढळून आला आहे.

निजामाची कबर

खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारूती सर्वांना माहित आहे. पण या कबरी समोरच असलेल्या बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात पहिला निजामाची कबर आहे. हा दर्गा ओवर्‍या ओवर्‍यांचे दगडी बांधकाम असलेला वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. खुलताबाद वेरूळ रस्त्यावर डाव्या बाजूच्या डोंगरावर एक तुर्की पद्धतीचा वेगळाच मनोरा दिसून येतो. ही आहे ऍटोमन साम्राज्याचा सुलतानाची कबर. हैदराबादच्या निजामाची सून निलोफर हीच हा पिता. त्याच्यासाठी ही कबर बांधली पण त्याचा मृतदेह इकडे आणता आलाच नाही. हे ठिकाण अशा नेमक्या ठिकाणी आहे की तेथून सर्व वेरूळ दृष्टीक्षेपात येते. या कबरीसाठी खुलताबादच्या शक्कर चटाने का दर्गा इथून एक छोटी वाट जाते. शक्कर दर्गा हे ठिकाण पण पाहण्यासारखे आहे.

सारोळा हिल स्टेशन

औरंगाबाद जळगांव रस्त्यावर चौक्यापासून जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला सारोळा म्हणून पाटी लागते. हे एक छोटे हिलस्टेशन आहे. या जागेपासून दुधना नदीचा उगम होतो. या उंच जागेवरून औरंगाबाद शहराचा विस्तार दृष्टीक्षेपात येतो.

भांगसी माता गड

औरंगाबाद दौलताबाद रस्त्यावर दौलताबाद टी पॉईंटपासून डाव्या बाजूचा रस्ता रेल्वे लाईन क्रॉस करून सरळ जातो भांगसी माता गडाकडे. हे ठिकाण देवी ठिकाणा सोबत एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वरपर्यंत जायला चांगल्या पायर्‍या केलेल्या आहेत.

कायगांव टोका 

औरंगाबाद नगर रस्त्यावर कायगांव टोका येथे प्रवरा गोदावरी संगमावर सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिरा जवळच इतर पाच मंदिरे आहेत ती सहसा बघितली जात नाहीत. शिवाय याच मंदिराचा नदीकाठ एक भुईकोट किल्लाच आहे. नदीचे पाणी उतरल्यावर घाटाच्या ओवर्‍या पहायला मिळतात.

कर्णसिंहाची छत्री

वाळूज मधील गोलवाडी येथे करणसिंहाची छत्री आहे. आठ दगडी कोरीव स्तंभावरची ही छत्री शेतात आहे. फारसे कुणीच इकडे फिरकत नाही. याच करणसिंहाचा एक पडका महाल कर्णपुर्‍यात आहे. देवीच्या मंदिराच्या जवळ जैन मंदिरापासून पुढे गेल्यावर शेतात एक बारव आहे. भाजलेल्या वीटांची ही बारव तीला चार ओवर्‍या आहेत.

इतर बातम्या- 

Sinhagad Tourism | सिंहगडावर फिरायला जाताय? मुक्कामासाठी ‘एमटीडीसी’चा बंगला उपलब्ध, अशी करा बुकिंग

टुरिस्ट गाईड होण्यासाठी 700 जणांना पर्यटन विभागाकडून ऑनलाईन प्रशिक्षण 

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.