PM Kisan Yojana: आनंदवार्ता धडकली! या तारखेला शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2 हजार, पण यांना नाही मिळणार लाभ

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता (PM Kisan 22nd Installment Date) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याची मोठी प्रतिक्षा आहे. याविषयीची तारीख समोर आली आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

PM Kisan Yojana: आनंदवार्ता धडकली! या तारखेला शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2 हजार, पण यांना नाही मिळणार लाभ
पीएम किसान योजना
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 07, 2026 | 12:14 PM

PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता (PM Kisan 22nd Installment Date) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतिक्षा आहे. यापूर्वी हा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत होते. पण आता माध्यमातील वृत्तानुसार, हा हप्ता लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. दोन हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील. पण या शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार नाही. त्याची कारणंही समोर आली आहेत.

13 मार्च रोजी जमा होईल रक्कम

पीएम किसान योजनेतंर्गत शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात येते. यातंर्गत शेतकर्‍यांना दर वर्षी 6 हजार रुपयांची मदत देण्यात येते. दर चार महिन्यांना हे 2-2-2 हजार रूपयांचा हप्ता जमा करण्यात येतो. वृत्तानुसार, शेतकरी सन्मान निधीचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होण्याची शक्यता आहे. 22 वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केलेली नाही.

हे शेतकरी हप्त्यापासून वंचित

केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही

ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे

बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे.

बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे.

शेतकऱ्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे

आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे

Farmer ID आवश्यक

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकर्‍यांना विना Farmer ID शिवाय PM Kisan योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील. या राज्यात फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. यासह इतर केंद्रावर फार्मर आयडी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्या शेतकर्‍यांना सु्द्धा अडचण येऊ शकते.

1 कोटी 31लाख फार्मर आयडी तयार

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली.

Follow Us