PM Kisan Yojana: बटाईदाराला लॉटरी? इतरांची शेती कसणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम?

PM Kisan Yojana Big Update: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण बटाईदार आणि इतरांची शेती कसणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो का? Budget खास तरतूद होईल का?

PM Kisan Yojana: बटाईदाराला लॉटरी? इतरांची शेती कसणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम?
पीएम किसान मोठी अपडेट
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jan 23, 2026 | 12:26 PM

PM Kisan Yojana 22nd Installment: देशभरातली कोट्यवधी शेतकर्‍यांना, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता 22 हप्ता कधी बदलणार याची प्रतिक्षा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर झाल्यानंतर हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना शेतकऱ्यांना मोठी मदत करते. त्यांना अडीअडचणीत थोडाबहुत पैसा हाताशी येतो. वार्षिक सहा हजार रुपये या योजनेतंर्गत देण्यात येतात. यावेळी ही रक्कम दुप्पट होण्याचा अंदाज बांधल्या जात आहे. पण अनेक जण इतरांची शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीजमीन नसते. बटाईदार आणि इतरांची शेती कसणाऱ्यांना या बजेटमध्ये लॉटरी लागणार का?

बटाईदारांना पण शेतकरी सन्मान निधी?

भारताच्या ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकार सध्या पीएम किसान योजनेचा लाभ देत आहे. पण देशात लाखो असे शेतकरी असे आहेत की त्यांच्या नावावर जमिनीचा तुकडाही नाही. ते इतरांची जमीन बटाईने घेतात. त्यावर घाम गाळतात आणि उत्पन्न वाटून घेतात. इतरांची शेती कसून ते उदरनिर्वाह करतात. यामध्ये बटाईदार मालकाला उत्पन्नातील अर्धा भाग देतो आणि उर्वरीत स्वतःकडे ठेवतो. त्याची जमीन चांगली ठेवतो. पण तो कधीच जमिनीचा मालक होऊ शकत नाही.

त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची जेव्हा चर्चा सुरू झाली. तेव्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबतच बटाईदारांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार का याची चर्चा झाल्याचे समजते. सध्याच्या योजनेच्या नियमात अशी कोणतीही तरतूद नाही. सध्या त्याच अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, ज्यांच्या नावे महसूल दप्तरी जमिनीची नोंद आहे. त्यामुळे बटाईदारांना सध्या या योजनेचा लाभ मिळत नाही.

सोशल मीडियावरच चर्चा

अर्थात या सर्व चर्चा सोशल मीडियावरच आहे. ज्याच्या नावे जमीन आणि जो अल्पभूधारक आहे. त्यालाच या सरकारी नियमानुसार, पंतप्रधान शेतकरी सन्माननिधीचा लाभ देण्यात येतो. पीएम किसान योजनेचा आधार जमीन ही आहे. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा केवळ छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरतीच ही योजना मर्यादीत ठेवण्यात आली. त्यानंतर सरकारने या योजनेत बरेच बदल केले आहे. तरीही बटाईदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याविषयी सरकार दरबारी कोणतीच हालचाल नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे 22 वा हप्ता बटाईदारांना मिळणार नाही.  सोशल मीडियावरील याविषयीच्या बातम्या  सध्या तरी अफवा मानल्या जात आहे.