प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर

| Updated on: Mar 31, 2021 | 2:44 PM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. PMFBY Scheme

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून या वर्षाची आकडेवारी जाहीर
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2018-19 या वर्षामध्ये 52 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 52 लाख 41 हजार 268 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत केलेले दावे मंजूर करुन त्यांचे पेसै देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात 13 जानेवारी 2016 रोजी करण्यात आली होती. पीक विमा योजनेसाठी दरवर्षी 5.5 कोटी शेतकरी अर्ज दाखल करतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले आहेत. (PMFBY fifty two lakh farmers claim settled in 2018-19)

पीक विमा योजनेचा उद्देश

प्राकृतिक संकट, कीड आणि अन्य रोगांमुळं पिकांचं नुकसान होतं. पीक विमा योजनेत समावेश असलेल्या पिकांना विमा कवच देण, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा योजनेचा उद्देश आहे. शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींच्या वापराला प्रोस्ताहन देणे यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

पीक विमा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येईल. राज्य सरकारकडून खरिप आणि रब्बी हंगामासाठी जाहिरात दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करणं हे ऐच्छिक असून बंधनकार नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध होईल किंवा विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. pmfby.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येईल.

विमा योजनेसाठी कोणती कागदपत्रं लागतात

अर्जदार शेतकऱ्याचा फोटो, ओळखपत्राचा पुरावा,शेतीची कागदपत्र, शेतात पेरणी किंवा लागवड केल्याचं पुरावा हा दाखला सरपंचाकडून घेऊ शकता.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

गेल्या काही दिवसांमध्ये 9 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले होते. यामुळं शेतकऱ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसानीचे दावे करण्याची गरज नसते. मात्र, अतिवृष्टी, वादळ, ढगफुटी, अवकाळी पाऊस या संकंटांच्या वेळी पीक काढल्यानंतर झालेल्य नुकसानीची पाहणी विमा उतरवलेल्या क्षेत्राच्या आधारावर केली जाते. त्यासाठी अशावेळी शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल माहिती द्यावी लागते..


संबंधित बातम्या:

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला(Opens in a new browser tab)

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

(PMFBY fifty two lakh farmers claim settled in 2018-19)