Unseasonal Rain : जळगाव कैरीचे भाव वाढले, मिरचीचेही भाव वधारले, कांदा १५ रुपये किलो, पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
जाड मिरची चाळीस रुपये किलो, गावरान मिरची तीस रुपये किलो, टमाटे २० रुपये किलो, गवार, गिलके ४० रुपये किलो, कांदा पंधरा रुपये किलो, गावरान कैरी २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी कैरी ३० रुपये किलो असे भाव वाढलेले आहे.

जळगाव : भुसावळमध्ये (bhusawal) गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात वादळवारा, गारपीट व पावसाने थैमान घातले आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे (farmer) मोठे नुकसान झाले आहेतर दुसरीकडे भाजीपाला मार्केटमध्ये भाव दहा रुपयांनी वाढलेले आहेत. यात गावरान मिरची व तोतापुरी कैरी २० रुपयांवरून ३० रूपये किलो झालेली आहे. कांदाही पंधरा रुपये किलो विकला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात वादळीवारा, गारपीटीनं थैमान घातलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. या गारपिटीमुळे व पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
जाड मिरची चाळीस रुपये किलो, गावरान मिरची तीस रुपये किलो, टमाटे २० रुपये किलो, गवार, गिलके ४० रुपये किलो, कांदा पंधरा रुपये किलो, गावरान कैरी २० ते २५ रुपये किलो, तोतापुरी कैरी ३० रुपये किलो असे भाव वाढलेले आहे. येत्या काळात भाजी मार्केट महाग होण्याची शक्यता आहे.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी पावसासह गारपट्टीचा कहर सुरूच आहे. अवगघ्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे 35 गावांतील सुमारे 2486 शेतकऱ्यांच्या 1282 हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झाले असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
मार्च महिन्यापासून वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात कहरच केला आहे. टप्प्याटप्प्याने पडलेल्या या पावसामुळे हजारो हेक्टरचं नुकसान धुळे जिल्ह्यात झालं आहे. तर दुसरीकडे तीन दिवसात झालेल्या पावसामुळे सुमारे 1282 पिकांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या काही भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी असून त्याची मदत मिळत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा धुळे जिल्ह्याला 27 ते 29 एप्रिल दरम्यान पावसाने झोपून काढले आहे. यात सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झाले असून यात वीस गावातील 839 शेतकऱ्यांच्या 492 हेक्टर वरील कांदा ज्वारी बाजरी टरबूज लिंबू पपई आदी पिकांचं मोठं नुकसान झाला आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यातील नऊ गावातील 1900 शेतकऱ्यांचे 495 हेक्टर वरील कांद्याचे नुकसान झाले आहे. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील पिकांचे नुकसान झाल्याचं कृषी खात्याचा अहवालात नमूद करण्यात आला आहे.
