अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी

| Updated on: Jan 08, 2022 | 7:45 AM

उत्पादन वाढीसाठी आणि पीक बहरण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते जमिनीचे आरोग्य. शेत जमिनीचे आरोग्य चांगले असेल तर भरघोस उत्पादन तर होतेच पण पिकांची मर्यादाही राहत नाही. ज्याप्रमाणे पीक वाढीसाठी जमिनीचे महत्व आहे अगदी त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय कर्ब, जमिनीचे खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, सूक्ष्म जिवाणूंची संख्या इत्यादी घटकांमध्ये जमिनिची सुपीकता अवलंबून आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : उत्पादन वाढीसाठी आणि पीक बहरण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते जमिनीचे आरोग्य. शेत (Soil fertility) जमिनीचे आरोग्य चांगले असेल तर भरघोस उत्पादन तर होतेच पण पिकांची मर्यादाही राहत नाही. ज्याप्रमाणे (Crop Increase) पीक वाढीसाठी जमिनीचे महत्व आहे अगदी त्याच प्रमाणे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय कर्ब, जमिनीचे खोली, कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, सूक्ष्म जिवाणूंची संख्या इत्यादी घटकांमध्ये जमिनिची सुपीकता अवलंबून आहे.

जमिनिचा सामू

जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण या चार गुणधर्माचा भौतिक- रासायनिक गुणधर्मात समावेश होतो. माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य संतुलित ठेवणे आणि पिकांचे जास्तीत जास्त किफायतशीर हेक्टरी उत्पादन मिळवणे शक्य आहे. सर्व साधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान सामू असल्यास पिकांना लागणारी सर्वच अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध स्वरुपात मिळतात आणि अशी जमीन सुपीक असते. कारण ही जमीन बहुतेक सर्व पिकांच्या वाढीसाठी योग्य असते.

सिंचनाचा कार्यक्षम वापर

जमिनीला अवास्तव व अतिरिक्त पाणी दिले जाते. यामुळे जमिनीची धूप होणे, जमीन पाणथळ होते. यावर उपाय म्हणजे पाणी हे पिकाच्या गरजेनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार द्यावे. जमिनीच्या विविध प्रकारांत पाणी धारण क्षमता, जमिनीची खोली, सुपीकता, निचऱ्याची क्षमता यामध्ये विविधता आढळते. यामुळे सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा.

सुपीकता वाढीसाठी उपाययोजना

जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब अत्यंत गरजेचे असते. जमिनीत सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर केल्यास निश्चितच योग्य तो परिणाम साधला जाऊन जमिनीची सुपिकता टिकवली जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी कमी मशागत व सपाटीकरण करावे. मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी. आंतर पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. पिकांचे अवशेष न जाळता गाडावेत. भर खतांचा (शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, प्रेसमड, कोंबडी खत, लेंडी खत, पाचट खत ) नियमित वापर करावा.

अशी द्या पशूसंगोपनाची जोड

शेती बांधावर वारा गतिरोधन तसेच गिरिपुष्प व हिरवळीचे पिके लावावीत. शेतीची पशुधन संगोपनाशी सांगड घालावी. जिवाणू खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे, रासायनिक खतांचा समतोलही राखावा लागणार आहे. क्षार, चोपण व विम्ल जमिन सुधरण्याकरिता भूसुधारकांचा वापर करावा. शेतात जल व मृदासंधारण करावे.

संबंधित बातम्या

Milk Price : काय सांगता ? दूधाचे दर वाढणार, काय आहेत कारणे अन् तज्ञांचे मत..!

Kharif Onion : अतिवृष्टीचा मारा, करप्याचा प्रादुर्भावानंतरही ‘तो’ मुख्य बाजारपेठेत दाखल, नगदी पिकातून शेतकऱ्यांना दिलासा

Latur Market : साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात, दर स्थिर असतानाही आवक वाढलेलीच