AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Price : काय सांगता ? दूधाचे दर वाढणार, काय आहेत कारणे अन् तज्ञांचे मत..!

शेतकऱ्यांना दूग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून दूधाचे दर वाढलेत असे कधीच झाले नाही. दरवाढीची कारणे ही वेगळीच आहेत. आता उत्पादनावर होणारा खर्च यामुळे दूधाच्या दरावर परिणाम होत असला तरी दुसरीकडे दूध हे दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्पादनावर होणाऱ्या खर्चामुळे आता दूधाचे दर वाढले जाणार असे मत व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे तेलंगणा येथेही दूधाच्या दरात वाढ झाली आहे.

Milk Price : काय सांगता ? दूधाचे दर वाढणार, काय आहेत कारणे अन् तज्ञांचे मत..!
दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वाढल्यामुळे गायीच्या दूधाचे दर वाढले आहेत.
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 5:05 PM
Share

मुंबई : शेतकऱ्यांना दूग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून (Milk price) दूधाचे दर वाढलेत असे कधीच झाले नाही. दरवाढीची कारणे ही वेगळीच आहेत. आता उत्पादनावर होणारा खर्च यामुळे (Milk price) दूधाच्या दरावर परिणाम होत असला तरी दुसरीकडे दूध हे दिवसेंदिवस वाढतच आहे.  (increased production costs) उत्पादनावर होणाऱ्या खर्चामुळे आता दूधाचे दर वाढले जाणार असे मत व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे तेलंगणा येथेही दूधाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन दूधाचा पुरवठाही कमी झाला आहे का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दूधाचे दर, उत्पादनावर होणारा खर्च आणि पुरवठा याबाबत जे प्रश्न उपस्थित राहत आहेत त्याचा मोगावा घेणे गरजेचे आहे.

उत्पादनाच्या तुलनेत चाऱ्याच्या किंमती वाढल्या

दरवर्षी पोषक वातावरणामुळे नोव्हेंबर ते मार्च या दरम्यानच्या कालावधीत दूध उत्पादनात वाढ होत असते. यंदाही ती झाली आहे मात्र, दुसरीकडे चाऱ्याच्या किंमती वाढत आहेत. पशूखाद्याचे दर तेजीत आहेत. चाऱ्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने उत्पादनात घट होत असल्याचा अंदाज वर्तलवला जात आहे. यामुळेच दूध पुरवठा कमी होत आहे का याची कारणे पाहणे तेवढेच गरजेचे आहेत.

यामुळे महाग होऊ शकते दूध..!

दुभत्या जनावराकरिता आता कापसापासून बनवली जाणारी सरकीचा अधिक वापर केला जातो. यामुळे दूधात वाढ होते असे शेतकरी मानतात. मात्र, या पशूखाद्यामध्ये गेल्या वर्षभरात 50 ते 60 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्सवर 5 जानेवारीच्या वायदा दरात कापसाच्या सरकीची किंमत 3300 रुपये प्रति क्विंटल नोंदविली गेली होती, तर गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी ती 2100 रुपयांच्या जवळपास होती. याप्रमाणेच सोयापेंड, मोहरी आणि भुईमूग खालचे दरही वाढले आहेत.

दूधाच्या उत्पादनाबद्दल सांगायचे झाले तर गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी म्हणतात की, गुजरातच्या दूध उत्पादनात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर देशभरातील दूधाच्या उत्पादनाची वाढ 5 ते 6 टक्क्यांनी झालेली आहे. भारत असा एकमेव देश आहे की, जिथे सर्वाधिक दूधाचे उत्पादन केले जाते. तर दुसरीकडे दूध उत्पादनाच्या खर्चामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे.

पुरवठा आणि मागणीवरही परिणाम

उत्पादनात कमी-अधिक झाले असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे दूध पुरवठ्यास अडचणी ह्या कायम राहिलेल्या आहेत. दूध उत्पादनावरील खर्च तर वाढलाच आहे पण त्याचा पुरवठाही नियमित होत नसल्याने आता दूधाच्या दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत डेअरी कन्सल्टंट डॉ. आर.एस. खन्ना यांनी व्यक्त केले आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी आणि डेअरी कन्सल्टंट डॉ. आर.एस. खन्ना यांच्या मते उत्पादन खर्च वाढल्यामुळे दूधाच्या दरात वाढ होईल असे म्हणने थोडे घाईचे होईल असे सोधी यांनी सांगितले तर उत्पादकांकडून दूधाचा पूरवठा कसा होणार यावर दूधाचे दर अवलंबून असल्याचे खन्ना यांनी सांगतिले आहे. त्यामुळे वाढता खर्च, वाढते उत्पादन अन् पुरवठ्यावर कोरोनाचा परिणाम यावरच दूधाचे दर अवलंबून आहेत.

संबंधित बातम्या :

Kharif Onion : अतिवृष्टीचा मारा, करप्याचा प्रादुर्भावानंतरही ‘तो’ मुख्य बाजारपेठेत दाखल, नगदी पिकातून शेतकऱ्यांना दिलासा

Latur Market : साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात, दर स्थिर असतानाही आवक वाढलेलीच

Sugarcane Harvesting : गाळप हंगाम जोमात मात्र, फडातला ऊस कोमात, ऊसतोडणीचे असे आहे अर्थकारण…!

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.