Soybean Market : दोन दिवसांमध्येच बाजारपेठेतले चित्र बदलले अन् शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, आता पुन्हा..

| Updated on: Feb 08, 2022 | 3:25 PM

गेल्या महिन्याभरापासून दरही 6 हजारपेक्षा अधिक मिळालेले नव्हते. त्यामुळे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी विक्री केली जात होती. मात्र, महिन्याभरात झाले नाही ते आता दोन दिवसांमध्ये झाले आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर आलेल्या सोयाबीनने पुन्हा उसळी घेतली असून मंगळवारी तर 6 हजार 400 रुपये दर झाला होता.

Soybean Market : दोन दिवसांमध्येच बाजारपेठेतले चित्र बदलले अन् शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, आता पुन्हा..
सोयाबीन संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा (Soybean Rate) सोयाबीनच्या दर वाढीच्या आशेचा किरण शेतकऱ्यांना दिसू लागलेला आहे. दर महिन्याला सोयाबीनच्या दरात चढ-उतार हे ठरलेलेच आहेत. आता खरिपातील सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना साठवणूकीतील सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. शिवाय गेल्या महिन्याभरापासून दरही 6 हजारपेक्षा अधिक मिळालेले नव्हते. त्यामुळे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी विक्री केली जात होती. मात्र, महिन्याभरात झाले नाही ते आता दोन दिवसांमध्ये झाले आहे. (Rate Increase) 6 हजार रुपये क्विंटलवर आलेल्या सोयाबीनने पुन्हा उसळी घेतली असून मंगळवारी (Latur Market) लातूर बाजारपेठेत तर 6 हजार 400 रुपये दर झाला होता. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेच चित्र निर्माण झाले आहे. मध्यंतरी दर घसरत असतानाही अनेक शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. त्यांचा अधिक फायदा होणार आहे. शिवाय दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

दीड महिन्यातील सर्वाधिक दर

यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या आवकपेक्षा रोज बदलत असलेल्या दराची चर्चा अधिक रंगलेली होती. शिवाय उत्पादन घटूनही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. हंगामाच्या सुरवातीला घेतलेला निर्णय आता अंतिम टप्प्यातही फायद्याचा ठरत आहे. कारण गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजार पेक्षा अधिक झाले नव्हते. संपूर्ण जानेवारी महिन्यात दर सातत्याने घटलेलेच पाहवयास मिळाले आहेत. मात्र, फेब्रुवारी महिन्याला सुरवात झाल्यापासून दरात सुधारणा होत आहे. आता वाढलेल्या दराच्या बाबतीत शेतकरी काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

दर वाढूनही आवक मात्र, सरासरीएवढीच

दर वाढले की शेतीमालाची आवक वाढणार हे निश्चित मानले जाते. सोयाबीनच्या बाबतीत सबंध हंगामात असे पाहवयास मिळाले नाही. दर वाढले तरी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानेच विक्री केलेली आहे. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दरात वाढ होत आहे. मंगळवारी तर सोयाबीन हे 6 हजार 400 वर गेलेले आहे. असे असतानाही 18 हजार पोत्यांचीच आवक झाली होती. उलट शेतकरी अजून दरवाढीची प्रतिक्षा करुन नंतरच विक्री करतील असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

तुरीची विक्रीही खुल्या बाजारात

तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणा हमी भाव खरेदी केंद्र उभारलेली आहेत. केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. असे असताना खुल्या बाजारपेठेत तुरीला 6 हजारापर्यंत दर मिळत आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता, शिवाय आर्द्रतेच्या प्रमाणामुळे खरेदी न करणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील तूर खरेदी केंद्र ही ओस पडलेली आहेत.

संबंधित बातम्या :

औषधी चिया बियाणे : कमी वेळेत अधिकचा नफा, कळंबच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

दुष्काळात तेरावा : कोरोनामुळे शेतीचा जोडव्यवसयाच धोक्यात, परिस्थितीने धवल क्रांतीवर ‘विरझण’

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?