AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : कोरोनामुळे शेतीचा जोडव्यवसयाच धोक्यात, परिस्थितीने धवल क्रांतीवर ‘विरझण’

आता पर्यंत दुष्काळामुळे जी परस्थिती या व्यवसयावर ओढावली नव्हती ती वेळ कोरोनामुळे आली आहे. कारण जिल्ह्यातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा, त-हाड कसबे येथील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती मात्र, त्याला जोड होती दूग्ध व्यवसायची. वाढत्या उत्पादनामुळे या भागातील शेतकरी धवलक्रांती कडे पाहत होते. परंतु दुष्काळ अन् कोरोनाचे ग्रहन लागल्याने त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांची ही धवलक्रांती संपूर्णतः धोक्यात आली आहे.

दुष्काळात तेरावा : कोरोनामुळे शेतीचा जोडव्यवसयाच धोक्यात, परिस्थितीने धवल क्रांतीवर 'विरझण'
गायी दुधाच्या दरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झालेली आहे.
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:13 PM
Share

धुळे : शेतीला दूग्धव्यवसयाची जोड मिळाल्यामुळेच शेतकरी तरलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही जोड व्यवसयातून भरुन काढता आलेली आहे. काळाच्या ओघात शेतीला बाजूला सारुन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी (Dairy Business) दूग्ध व्यवसयालाच मुख्य व्यवसाय केले आहे. मात्र, आता पर्यंत दुष्काळामुळे जी परस्थिती या व्यवसयावर ओढावली नव्हती ती वेळ (Corona) कोरोनामुळे आली आहे. कारण (Dhule District) शिरापूर तालुक्यातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा, त-हाड कसबे येथील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती मात्र, त्याला जोड होती दूग्ध व्यवसायची. वाढत्या उत्पादनामुळे या भागातील शेतकरी धवलक्रांती कडे पाहत होते. परंतु दुष्काळ अन् कोरोनाचे ग्रहन लागल्याने त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांची ही धवलक्रांती संपूर्णतः धोक्यात आली आहे. ग्रामीण भागातील दुभत्या जनावरांअभावी दुधाची आवक घटली आहे. तर सध्याच्या स्थितीत या व्यवसयाचा केवळ आधार ग्रामस्थांना मिळत आहे. मात्र, ज्या पध्दतीने दूधाच्या उत्पादनात वाढ झाली होती ती एका उंचीवर घेऊन जाणारी होती. पण सर्वकाही कोरोनाने हिरावले आहे.

त-हाडी परिसरातील शेतकऱ्याकडून दुग्ध

व्यवसायाच्या आधाराने कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जात असल्याने शेती नंतर या व्यवसायाला शेतकऱ्याकडून अधिक महत्त्व दिले जात होते परंतु या वर्षीच्या दुष्काळाने कोरोना शेतकऱ्यांचा हा जोडव्यवसाय पूर्णतः कोलमडला आहे. चारा व पाणी या प्रमुख अडचणीमुळे शेतकऱ्यांनी दुभती जनावरे दुष्काळा कोरोनाच्या प्रारंभाला खाटकाच्या दावणीला बांधली याचा परिणाम त-हाडी वरूळ भटाणे जवखेडा त-हाड कसबे सह दुग्ध व्यवसायावर झाला आहे. तालुक्यात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सध्याच्या स्थितीत त्यांच्याकडे दूध उपलब्ध आहेत त्यांच्या दुधाला किरकोळ विक्रीमध्ये भाव वधारून मिळत आहेत. तर कित्येक गावात दूध मिळणेही अवघड झाले आहे.

जनावरे विकण्याची नामुष्की

संकटे आली की ती चोही बाजूने येतात. अगदी त्याप्रमाणेच दूध व्यवसयाचे झाले आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीने मागणी एवढी घटली की विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. परिणामी उत्पादन वाढले आणि मागणी घटल्याने दूग्धव्यवसाय अडचणीत आला. जनावरांना पोसणे देखील मुश्किल झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी दुभती जनावरे विकली. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दुग्ध व्यवसायामुळे लागणारा हातभार खंडित झाला असून आर्थिक घडी विस्कटली आहे.

इतर व्यवसायही अडचणीत

या भागात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने हॉटेल धारकांची संख्याही वाढली होती. शिवाय व्यवसयासाठी चांगल्या प्रकारचे दूध मिळत असल्याने व्यवसायिक आणि ग्राहकही समाधानी होते. पण गेल्या वर्षभरात उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात घटले आहे की, व्यवसायिकांना दूधही मिळत नाही. परिणामी पिशवीबंद दूधाचा वापर वाढला आहे. त्यामुळे कोरोनामुळे किती दुरगामी परिणाम झाले आहेत याची प्रचिती ही धवलक्रांती ‘विरझल्याने’ जाणवत आहे.

संबंधित बातम्या :

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?

Sugarcane Sludge: राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात, साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना? वाचा सविस्तर

Strawberry : चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी, मस्त अन् स्वस्तही, पिकतं तिथंच विकतं, शेतकऱ्यांचं कष्टही कमी होतं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.