सोयाबीनच शेतकऱ्यांना तारणार, तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

| Updated on: Dec 01, 2021 | 12:41 PM

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सोयाबीनच आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीपुर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 रुपयांवर होते आता मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी होत असल्याने सोयाबीनच्या किमंती वाढत आहेत.

सोयाबीनच शेतकऱ्यांना तारणार, तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : खरीप हंगामातील पिके सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सोयाबीनच आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीपुर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 रुपयांवर होते आता मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी होत असल्याने सोयाबीनच्या किमंती वाढत आहेत. सध्या सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटलचा दर आहे. तर दुसरीकडे बाजारात नव्या तुरीची देखील आवक सुरु झाली. सुरवातीच्या टप्प्यात आवक वाढल्याने तुरीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार झालेला आहे. दिवाळीपुर्वी सोयाबीनला 4 हजार 500 रुपये भाव होता. मात्र, त्यानंतर बाजारपेठेतले चित्र हे बदलले आहे. सोयाबीन हे 7 हजार रुपये क्विंटलपर्यंत जाईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोयाबीनची आवक कमी मागणी अधिक

पुणे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही घटलेली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठाच होत नसल्याने सोयाबीनचे दर हे वाढत आहेत. हेच गणित शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सोायाबीनची आवक घटलेली आहे. तर प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून आता सोयाबीन साठणूकीवर भर दिला जात आहे. त्यामुळे मागणी वाढली असल्याने भविष्यातही दर वाढतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

तुरीची 90 टन आवक

खरीप हंगामातील तूर हे अंतिम पिक आहे. तूरीला अतिवृष्टीचा आणि अवकाळा पावसाचा फटका बसलेला नाही. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. पुणे बाजार समितीमध्ये तुरीची आवक ही 70 ते 90 टन होत आहे. नुकतेच तुरीची काढणी झाली असल्याने आवक वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरात घसरण झाली होती. मात्र, आता तूर ही 9 हजारावर स्थिर आहे. मात्र, आवक कायम वाढत राहिली तर दर अणखीन घसरतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोयापेंडच्या आयातीचा परिणाम सोयाबीनच्या दरावर

उर्वरीत सोयापेंडच्या आयातीसंदर्भात केंद्रीय पशूसंवर्धन मंत्रा पुरुषोत्तम रुपाला यांनी सोयापेंडच्या आयातीचा कालावधी वाढविण्याची मागणी विदेश व्यापार महासंचालक यांच्याकडे केली आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 6 लाख 50 हजार टन सोयापेंडचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे उर्वरीत सोयापेंडचा पुरवठा झाला तरच सोयाबीनचे दर नियंत्रणात राहणार असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केलेला आहे. त्यामुळे केंद्र स्तरावरील निर्णयाचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर होताना पाहवयास मिळत आहे.

संबंधित बातम्या :

खरीप-रब्बी नंतर आता अवकाळीचा फळबागांनाही फटका, देवगड हापूसच्या उत्पादनात निम्म्याने घट

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत

ऊसाच्या पाचटाचे राजकारण : बिलात 5 टक्के कपात होत असल्याने शेतकरी मागणार न्यायालयात दाद