खरीप-रब्बी नंतर आता अवकाळीचा फळबागांनाही फटका, देवगड हापूसच्या उत्पादनात निम्म्याने घट

वातावरणातील बदलाचा फटका यंदा सर्वच हंगामातील पिकांना बसलेला आहे. आता खरीप-रब्बी हंगामानंतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. कारण आंबा पिकाला मोहर लागला असतानाच असतानाच जिल्ह्यात 15 दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे.

खरीप-रब्बी नंतर आता अवकाळीचा फळबागांनाही फटका, देवगड हापूसच्या उत्पादनात निम्म्याने घट
संग्रहीत छायाचित्र

सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलाचा फटका यंदा सर्वच हंगामातील पिकांना बसलेला आहे. आता खरीप-रब्बी हंगामानंतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. कारण आंबा पिकाला मोहर लागला असतानाच असतानाच जिल्ह्यात 15 दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. सुरवातीला अवकाळी पाऊस आणि आता दमट वातावरण यामुळे देवगड हापूसच्या कलमांना याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. मोहर पावसामुळे कुजलेला असून आता तो गळत आहे. त्यामुळे देवगडच्या हापूसच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने फळबागायदार शेतकरी चिंतेत आहेत.

पिके आणि फळबागा अंतिम टप्प्यात असतानाच आतापर्यंत अवकाळी पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. खरिपातही सोयाबीन, तुर, कापूस या पिकांचे नुकसान पावसामुळेच झाले होते. तर आता रब्बी हंगामावरही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. तर कोकणात मात्र, फळबागा बहरण्याच्या दरम्यानच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचा मोहर गळून पडला अहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच आंब्याला मोहर लागण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे सर्वकाही वेळेत होऊन योग्य वेळी देवगड हापूस बाजारात दाखल होणार होता. पण आता थेट उत्पादनावरच परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

फवारणीचा अधिकचा खर्च

बदलत्या वातावरणाचा परिणाम फळबागांवर तर होतच आहे पण याची झळ शेतकऱ्यांच्या खिशालाही बसत आहे. कारण मोहर लागलेल्या आंब्यावर आता किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या आंब्याच्या उत्पादनातून चार पैसे मिळतील ही आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, त्यापूर्वी किटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणीसाठी हजारो रुपये खर्ची करावे लागत आहेत. बदलत्या वातावरणामुळे दोन दिवसांतून एकदा फवारणी ही बंधनकारकच झाली आहे. अन्यथा आहे त्या फळबागेच्या नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे.

उत्पादनात होणार निम्म्याने घट

यंदा अतिवृष्टी, अवकाळी आणि वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादनावर होत आहे. आता आंबा हे फळपिक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, किडीचा आणि मोहर गळतीचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 30 ते 40 घट होणार असल्याचा अंदाज बागायत शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा शक्य होणार नाही. यामुळे देवगड हापूसला मागणी राहिली तरी उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. यंदा हापूस आंबा बाजारपेठेत उशिराने दाखल होणार असून हंगाम केवळ 70 दिवसाचा राहणार आहे. हा सर्व बदल केवळ वातावरणामुळे झालेला आहे.

आंबा पिकाची जोपासना म्हणजे तारेवरची कसरत

वर्षभर आंब्याच्या बागा तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासायच्या आणि अंतिम टप्प्यात होत असलेले हे नुकसान दरवर्षीचे झाले आहे. त्यामुळे परीश्रम तर वाया जातातच पण आर्थिकही नुकसान होते. आता यंदा सर्वकाही वेळेवर झाले होते. मात्र, देवगड हापूस कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली की अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे मोहर तर गळालाच पण आता दमट वातावरणामुळे मोहर कुजून जात आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असल्याने फळबागा जोपासने अवघड झाल्याचे फळ बागायतदार बाळा पारकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : सोयाबीनचे दर घसरताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत

ऊसाच्या पाचटाचे राजकारण : बिलात 5 टक्के कपात होत असल्याने शेतकरी मागणार न्यायालयात दाद

गंधकाच्या वापरामुळे पिके बहरात अन् उत्पादनातही वाढ, पहा काय आहेत फायदे ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI