कमी शेतीतही लाखोंची कमाई, बटाटा किंवा टॉमेटो नाही तर ‘स्ट्रॉबेरी’ची शेती, वाचा खास टिप्स

सध्या शेतकरी देखील आपलं उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहेत. त्यासाठी केवळ बटाटा, टॉमेटो किंवा फळभाज्यांवरच अवलंबून न राहता नवे प्रयोगही होत आहेत.

कमी शेतीतही लाखोंची कमाई, बटाटा किंवा टॉमेटो नाही तर 'स्ट्रॉबेरी'ची शेती, वाचा खास टिप्स

नवी दिल्ली : सध्या शेतकरी देखील आपलं उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहेत. त्यासाठी केवळ बटाटा, टॉमेटो किंवा फळभाज्यांवरच अवलंबून न राहता नवे प्रयोगही होत आहेत. यात सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला चांगलीच पसंती मिळत आहेत. अनेक शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. हे पिक केवळ थंड प्रदेशातच नाही तर अगदी महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये देखील घेतलं जातंय. या पिकात गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला नफा मिळतानाही दिसत आहे (Strawberry farming know how to earn more money from strawberry know all details here).

अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील उत्तर प्रदेशमधी स्ट्रॉबेरीच्या शेतीचं कौतुक केलंय. त्यांनी बुंदेलखंड येथील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा उल्लेख करत या शेतकऱ्यांचं कौतुक केलंय. तसेच इतर शेतकऱ्यांना देखील या पिकाची शेती करण्याचं आवाहन केलंय. स्ट्रॉबेरीचं उत्पन्न देशातील विविध राज्यांमध्ये होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे तर स्ट्रॉबेरीची शेती आणखी सोपी झालीय.

तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करु शकता

जर तुम्हाला कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर स्ट्रॉबेरीची शेती तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. ही शेती करण्यासाठी केवळ काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या गोष्टी समजल्या तर तुम्ही सहजपणे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून मोठा नफा कमाऊ शकता. स्ट्रॉबेरीची शेती साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात केली जाते. हे पिक थंड वातावरणात घेतलं जातं. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये थंडीची सुरुवात झाली की स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. जानेवारी, फेब्रुवारीत हे स्ट्रॉबेरीचं पिक काढायला येतं.

स्ट्रॉबेरीची शेती कशी करावी?

जर तुम्हाला स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सप्टेंबरपासूनच कामाला लागलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये साधारणतः तीन वेळा शेतीची चांगली मशागत करुन घ्यावी. भूसभूशीत जमीन यासाठी अधिक चांगली असती. ज्या क्षेत्रात हे पिक घ्यायचं आहे त्याला योग्य प्रमाणात खत टाकून घ्यावं. फॉस्फरसयुक्त केमिकल खतांचाही यासाठी उपयोग करता येईल. यासाठीचे वाफे तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. वाफ्यांमधील सरीची रुंदी साधारण 2 फूट आणि दोन सऱ्यांमधील अंतर दीड फूट असणं आवश्यक आहे.

यासाठी मल्चिंग आणि ड्रिप सिंचनला प्राधान्य दिल्यास याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळून त्याची चांगली वाढ होते. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होते. यासाठी माती कोणत्या प्रकारची आहे हेही महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे पीक घेण्याआधी आपल्या शेतातील मातीचा प्रकार या पिकाला पुरक आहे की नाही हेही तपासून घेणं उपयोगाचं ठरेल.

खर्च आणि कमाई किती?

या पिकाच्या उत्पन्नासाठी साधारणतः दीड एकरासाठी 5-6 लाख रुपये खर्च येतो आणि त्यातून खर्च जाऊन अंदाजे 7-8 लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. हा खर्च स्ट्रॉबेरीच्या प्रकारावर देखील अवलंबून असतो. यापेक्षा कमी खर्चात देखील याची शेती करता येते. त्या प्रकारे देखील अंदाजे 2-3 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

हेही वाचा :

Strawberry Benefits | हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या त्यांच्याविषयी…

 थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!

 पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड

व्हिडीओ पाहा :

Strawberry farming know how to earn more money from strawberry know all details here

Published On - 4:45 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI