Marathwada : उन्हाळी हंगामातील पिकांवर तिहेरी संकट, उत्पादनात घटणार की शेतकऱ्यांना प्रयत्नांना यश मिळणार

मराठवाड्यात उन्हाळी हंगामात भुईमूग, सोयाबीन आणि राजमा ही पिके वावरात आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने अजून महिनाभर पाणी कसे टिकवून वापरावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर महावितरणवरच या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.

Marathwada : उन्हाळी हंगामातील पिकांवर तिहेरी संकट, उत्पादनात घटणार की शेतकऱ्यांना प्रयत्नांना यश मिळणार
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेत
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 02, 2022 | 3:14 PM

लातूर : वाटलं होत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने (Summer Season) उन्हाळी हंगामात सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे होईल, पण संकटाशिवाय एक पीक पदरात पडत नाही. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी उन्हाळी हंगामात शेतकरी जोमाने कामाला लागला. (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Production Increase) उत्पादन वाढण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता पण आता अंतिम टप्प्यात तिहेरी संकट या पिकांवर ओढावले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी कसा मार्ग काढणार हे पहावे लागणार आहे. खरिपाप्रमाणेच उन्हाळी हंगामात नुकासनीची परस्थिती निर्माण झाली आहे पण खरिपात अधिकच्या पावसामुळे नुकसान झाले तर आता वाढत्या उन्हाच्या झळामुळे पिके करपू लागली आहेत. उन्हाळी पिकांना अजूनही तीन आठवड्याचा कालावधी आहे. या दरम्यानच्या काळात पीक जोपासणेच महत्वाचे ठरणार आहेत.

शेतकऱ्यांसमोर कोणती संकटे?

मराठवाड्यात उन्हाळी हंगामात भुईमूग, सोयाबीन आणि राजमा ही पिके वावरात आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने अजून महिनाभर पाणी कसे टिकवून वापरावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर महावितरणवरच या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या कृषी पंपासाठी 7 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्याच अनुशंगाने पाणी देण्याची कामे उरकून घ्यावी लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिके अडचणीत आहेत.

सोयाबीनला अधिकचे पाणी

उन्हाळी हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे. सोयाबीन हे पावसाळी म्हणजेच खरिपातील पीक आहे. त्यामुळे या पिकाला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा होता पण वाढत्या उन्हामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. आता उर्वरीत काळात पिके जोपासायची कशी हा प्रश्न आहे. सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे. अशातच पाणी कमी पडले तर थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.

शेतकऱ्यांकडे पर्याय काय?

उशिरा पेर झालेल्या सोयाबीनला परिपक्व होण्यासाठी अजून 3 आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पाण्याचे योग्य नियोजन केले तरी उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय पिकांना पाणी देताना रात्रीच्या वेळी दिले तर कमी पाणी लागणार आहे. शेंगा पोसल्याशिवाय पाणी तोडू नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.