काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही

| Updated on: Oct 12, 2021 | 3:53 PM

चॉकलेट हे केवळ आता लहान मुलं आणि प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिलेले नाही तर जनावरेही त्याची चव चाखणार आहेत. त्यामुळे असा चॉकलेट कॅडीची निर्मिती आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही
जनावरेही खाणार आता चॉकलेट कॅडी
Follow us on

मुंबई : ‘चॉकलेट’ म्हणलं की समोर येतात ती लहान मुलं. लहान मुलांप्रमाणेच तरुणांना देखील (Choklate) चॉकलेटचे आकर्षण राहिलेले आहे. इथं पर्यत ठिक आहे. पण, आता जनावरांसाठीही चॉकलेट कॅंडी येत आहे. आहो खरंच ! बरं ती काय हौस म्हणून नाही तर या चॉकलेट (Benefits Of Choklate) कॅंडीचे फायदेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे चॉकलेट हे केवळ आता लहान मुलं आणि प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिलेले नाही तर जनावरेही त्याची चव चाखणार आहेत. त्यामुळे असा चॉकलेट कॅडीची निर्मिती आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकार स्थरावर एक ना अनेक उपक्रम राबवले जातात. शेतकऱ्यांनी पशुचे संवर्धन करावे म्हणून वेगवेगळ्या योजना, अनुदान दिले जात आहे. पण याच जनावरांना पोषक आहार मिळावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पण, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञांनी केलेला प्रयत्न हा वेगळ्याच स्वरुपाचा आहे. येथील तज्ञांनी जनावरांसाठी खास कॅडी चॉकलेट विकसित केले आहे. हे चॉकलेट विशेषत: गाई-म्हशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. चॉकलेट हे चविष्ट तर असणार आहेच शिवाय यामध्ये पौष्टीक द्रव्ये ही राहणार आहेत. हे विद्यापीठात तयार करण्यात आले असून लवकरच आता बाजारातही उपलब्ध होणार आहे.

‘नर्मदा विटा मिन लिक’

खास जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या या चॉकलेटचे नाव आहे ‘नर्मदा विटा मिन लिक’ याकरिता मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे चॉकलेटची आवड केवळ सामान्य लोकांपुरतीच मर्यादित राहणार नाही तर प्राणीही चॉकलेटदेखील खाऊ शकणार आहेत. परंतु हे चॉकलेट सामान्य लोकांच्या चॉकलेटपेक्षा वेगळे आहे. कारण हे खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान तर होणारच नाही पण वेगवेगळ्या पध्दतीने जनावरांना फायदाच होणार आहे. जनावरांसाठी चारा, पेंढ ही खाद्य तर आहेतच पण ही चॉकलेट कॅंडी त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्यात आयोडीनसह अनेक आवश्यक वस्तू आहेत, ज्या प्राण्यांना खाण्यासाठी गोड आणि स्वादिष्ट लागतील. प्राणी ते चाटून खाऊ शकतील आणि सुमारे तीन ते चार दिवसांत एक कँडी संपणार आहे.

पोषक तत्त्वांनी समृद्ध

पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरू सीता प्रसाद तिवारी यांनी सांगितले की, प्राण्यांना भरपूर पोषक द्रव्ये मिळू शकतील म्हणून प्राण्यांसाठी विशेष प्रकारचे अन्न तयार करण्याची जबाबदारी त्यांनी पशुपोषण विभागाकडे दिली होती. तज्ज्ञांनी तयार केलेल्या या चॉकलेटला तांत्रिकदृष्ट्या कॅटल चॉकलेट म्हटले जात आहे, जे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाईल. यामुळे गायी किंवा म्हशींना भेडसावणाऱ्या समस्या तर कमी होतीलच, शिवाय दुधाचे उत्पादनही वाढेल. ही जनावरांची चॉकलेट्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ आता लवकरच सरकारला पत्र लिहिणार असून सरकारी यंत्रणेच्या आधारे ते लवकरच राज्यभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दूध उत्पादनातही होणार वाढ

दूध उत्पादन वाढीसाठी सरकार वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. पण हा वेगळाच प्रयोग ठरणार आहे. सरकी, पेंड शिवाय हिरव्या चाऱ्यामुळे गाई-म्हशीचे दूध वाढते. पण आता चॉकलेट कॅडीतून पोषण तत्वे तर मिळणार आहेतच. शिवाय दूधाचे उत्पादनही वाढणार आहे. (The animal now has nutrition from ‘chocolate cady’. Milk production will also increase)

संबंधित बातम्या :

यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत

दूध उत्पादन वाढीसाठी आता गाईला कालवड अन् म्हशीला पारडीच होणार

महसूलचा मनमानी कारभार, नुकसान सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे..!