AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

सध्या कृषीपंप थकबाकीवरुन विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा धडाका महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून थकबाकी ही शेतकऱ्यांकडे नाही तर महावितरणकडेच असल्याचा दावा भाजपच्या वताीने करण्यात आला आहे.

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?
Agricultural Pump
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 9:36 AM
Share

सुनिल थिगळे : शिरुर : सध्या कृषीपंप थकबाकीवरुन (Light Connection) विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा धडाका महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून (Arrears) थकबाकी ही शेतकऱ्यांकडे नाही तर महावितरणकडेच असल्याचा दावा भाजपच्या वताीने करण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाई विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान हा आरोप भाजप उद्योग आघाडीच्यादतीने करण्यात आला आहे. महावितरणने उभारलेले विद्युत खांब, रोहित्र आणि मनोरा टॉवर हे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरच असून या भागातील शेतकऱ्यांना 2003 पासूनची नुकसान भरपाई ही महावितरणकडून मिळालेली नाही. त्याचअनुशंगाने भाजपाच्या उद्योग आघाडीच्यावतीने शिरुर येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले होते.

वीज तोडणी करण्यास आलेले कर्मचारी परत जाणार कसे?

कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे सध्या विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतलेला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मध्यंतरी निसर्गाचा लहरीपणा आणि आता ही कारवाई त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजतोडणी करण्यास आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास पुन्हा माघारी फिरकू देले जाणार नसल्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने सरसकट विद्युत पुरवठा खंडीत करु नये उलट अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे.

आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये म्हणून भाजप उद्योग आघाडीच्यावतीने शिरुर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनातील विविध मुद्यावर पदाधिकारी आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्यामध्ये बैठक पार पडली मात्र, महावितरणची शेतकऱ्यांकडे नाही शेतकऱ्यांचीच महावितरणकडे थकबाकी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले शिवाय आता विद्युत पुरवठा खंडीत करण्यास कर्मचारी आले तर पुन्हा त्यांना माघारी फिरकू देणार नाहीत अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे ही बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता नेमका काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे.

कारवाईमुळे पिकांचे नुकसान

सध्या निसर्गाचा लहरीपणा दूर झाला असला तरी महावितरणच्या कारवाईमुळे संकट कायम आहे. मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके सुकत आहेत. आता अवकाळी, गारठा या नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता हे नवीनच संकट उभे राहत असल्याने शेतकरी आणि भाजप पदाधिकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या :

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणचा गलथान कारभार

Onion Market: सोलापुरात कशामुळे होतेय रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक? लासलगावही पिछाडीवर

Banana : केळीची आवक घटूनही दर स्थिरावलेलेच, केव्हा बदलणार चित्र?

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.