द्राक्ष बागा आता जोमात वाढणार, वातावरण बदलाची फरक नाही पडणार, State Government चा काय आहे मेगा प्लॅन?

| Updated on: Apr 06, 2022 | 12:11 PM

द्राक्ष बागांवर यंदा सर्वाधिक परिणाम हा वातावरणातील बदलाचा राहिलेला आहे. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ वातावरणाचे संकट यंदाच्या हंगामात राहिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. एवढेच नाही तर आता हंगाम संपल्यानंतरही अवकाळीची अवकृपा असल्याने द्राक्ष बागा ह्या जमिनदोस्त होत आहेत. यंदा नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

द्राक्ष बागा आता जोमात वाढणार, वातावरण बदलाची फरक नाही पडणार, State Government चा काय आहे मेगा प्लॅन?
Follow us on

नाशिक : द्राक्ष बागांवर यंदा सर्वाधिक परिणाम हा (Climate change) वातावरणातील बदलाचा राहिलेला आहे. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ वातावरणाचे संकट यंदाच्या हंगामात राहिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. एवढेच नाही तर आता हंगाम संपल्यानंतरही (Untimely Rain) अवकाळीची अवकृपा असल्याने द्राक्ष बागा ह्या जमिनदोस्त होत आहेत. यंदा नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील (Cover To Vineyard) द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्यात येणार असल्याचे खुद्द राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनीच सांगितले आहे. त्यामुळे हा प्रयोग जर यशस्वी झाला तर यामध्ये वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कशी होणार क्षेत्राची निवड?

बदलत्या वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागांवर होणार नाही यासाठी राज्यातील 100 हेक्टरावरील बागांवर प्लॅस्टिक अच्छादन राहणार आहे. याकरिता एकरी 4 लाख 50 हजार एवढा खर्च आहे. त्यामुळे लागलीच यासाठीची योजना राबवणे तसे अवघड असल्याने पहिल्या टप्प्यात या प्रयोगाचे परिणाम काय होणार हे तपासले जाणार आहेत. यासाठी 100 हेक्टर द्राक्ष बागाचे क्षेत्र निवडले जाणार आहे. यंदाच्या वर्षीच हा प्रयोग राबवला जाणार असून क्लस्टर न करता थेट लॉटरी पध्दतीने क्षेत्राची निवड केली जाणार आहे. यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पॉलिहाऊस किती ऊंचीवर असावे? त्याची जाडी किती अशा गोष्टींची माहिती करुन घेतली जाणार आहे. याची जबाबदारी ही राहुरी कृषी विद्यापीठ पार पाडणार आहे.

1 लाख 20 हजार हेक्टरावर द्राक्ष बागा

राज्यात अधिकच्या उत्पन्नासाठी द्राक्ष बागांच्या क्षेत्रात वाढ होत गेली आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा यामधील मोठा अडसर ठरत आहे. राज्यात तब्बल 1 लाख 20 हेक्टरावर द्राक्ष बागा आहेत. यामध्ये नाशिक, सांगली भागात सर्वाधिक बागा आहेत. यामुळे रोजगारनिर्मिती तर होतेच पण परकीय चलनही मिळते. यंदा तर उत्पादानात मोठी घट झाल्याने किमान हा प्रयोग राबवला गेल्याने याचे फलित काय हे लक्षात येईल. त्यानुसारच राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

केंद्र सरकारचाही वाटा महत्वाचा

राज्यात द्राक्ष उत्पादनाचे क्षेत्र अधिक आहे. या उत्पादकांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही राज्याची तर आहेच पण केंद्राने यामध्ये हिस्सा दिला तर अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. हा प्रयोग चालू वर्षी केला जाणार असून यामधून काय साध्य होणार हे पाहिले जाणार आहे. याची सर्व माहिती केंद्राला पाठवून त्यांचा हिस्सा किती यावरही माहिती मागवली जाणार असल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहेत. आता विचारधीन असलेला प्रयोग प्रत्यक्षात राबवला जावा अशीच मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Unseasonal Rain : द्राक्ष तोडणीनंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली ‘ही’ किमया

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं