AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली ‘ही’ किमया

शेती व्यवसायात अनंत अडचणी, शेती करावी का विकावी अशी एक ना अनेक कारणे सांगणारे पावलोपावली भेटतात. पण शेती व्यवसयाला आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड दिल्यावर काय होऊ शकते हे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. विदर्भ तसा दुष्काळी भाग, सध्या रखरखत्या उन्हामध्ये शेताकडेही कुणी फिरकत नाही.पण मंगरुळपीर तालुक्यातील चहल गावच्या शिवारात 35 एकराची अशी शेती आहे की जिथे गेल्यावर या जमिनीतून तुमचा पायही बाहेर निघणार नाही.

Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली 'ही' किमया
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने अत्याधुनिक यंत्राचा वापर करुन 35 एकरावर फळबागांची लागवड केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 10:04 AM
Share

वाशिम : शेती व्यवसायात अनंत अडचणी, शेती करावी का विकावी अशी एक ना अनेक कारणे सांगणारे पावलोपावली भेटतात. पण शेती व्यवसयाला (Modern Machinery) आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यावर काय होऊ शकते हे (Washim) वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. विदर्भ तसा दुष्काळी भाग, सध्या रखरखत्या उन्हामध्ये शेताकडेही कुणी फिरकत नाही.पण मंगरुळपीर तालुक्यातील चहल गावच्या शिवारात 35 एकराची अशी शेती आहे की जिथे गेल्यावर या जमिनीतून तुमचा पायही बाहेर निघणार नाही. असल्या वाढत्या उन्हामध्ये काय असणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण या 35 एकराच्या क्षेत्रात काय नाही हे विचारा? कारण ठाकरे यांच्या शेतामध्ये विविध (Orchard) फळबागा फुलवल्या आहेत. त्यात सीताफळ, बारमाही येणारा आंबा, संत्रा, कमी उंचीचे नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीकं ते घेतात.दोन वर्षापूर्वी नवा प्रयोग म्हणून त्यांनी सफरचंदाचीही लागवड केली. आता एप्रिलच्या या कडक उन्हात त्याला फळधारणा होतेय.

आधुनिकतेच्या जोरावर बहरतेय शेती

शेती आहे म्हणून करायाचा विषय राहिलेला नाही तर योग्य नियोजन आणि नवनवीन प्रयोग यामधूनच उत्पादन वाढणार आहे. याचाच अभ्यास करुन प्रवीण ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसयात अमूलाग्र बदल केला आहे. त्यांची शेती ही कोरडवाहू भागातलीच शेीजवळ ना कोणते धरणं ना कोणती मोठी नदी. मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली 35 एकर शेती हिरवीगार केलीय. पिकाला पाणी देण्यासाठी सम्पूर्ण ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे.ज्यामुळे बागेला हवं तेव्हडच पाणी, योग्य वेळी, मेंटेन करून दिलं जातं, याच नियोजनाद्वारे फळझाडांना खतंही दिली जातात. ज्यामुळे पाणी, खत आणि वेळीचीही बचत होते.

कोरडवाहू जमिनीवर आता बहतात फळबागा

कोरडवाहू म्हणजे ज्या शेतजमिनीवर पाण्याची सोयच नाही. जिथे खरिपात पिके घेणे मुश्किल आहे त्या कोरडवाहू जमिनीवर ठाकरे यांनी फळबागा लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांना त्यांचा हा प्रयोग फसणार असेच सांगितले. पण फळबाग लाडवडीपूर्वीच त्यांनी केलेले नियोजन आता कामी आले आहे. त्यामुळे या कोरडवाहू क्षेत्रावर आज सीताफळ, आंबा, संत्री, नारळ, चिकू, स्ट्रॉबेरी, हंगामी कलिंगड अशी एक ना अनेक फळपिके बहरत आहेत. यातून यंदा लाखोचे उत्पादन मिळेल असा त्यांचा दावा आहे.

पारंपरिक पिकांना बाजूला सारत फळबागावर भर

पारंपरिक पिकांतून मेहनत आणि वेळ दोन्हीही वायाच जातात. त्यामुळे प्रवीण ठाकरे यांनी फळबागांची लागवड करण्यापूर्वी सर्वात महत्वाचे ते नियोजन केले. यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्ची केले असले तरी उत्पादनातून त्याची भरती होणार आहे. यापूर्वी ते देखील हंगामी पिके आणि खरिपात सोयाबीनचाच आधार घेत होते. पण आता शेती व्यवसयाचे स्वरुप बदलत आहे. त्यानुसार ठाकरे यांनी बदल केला असून आता उत्पादनात वाढ होत आहे.

संबंधित बातम्या :

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं

Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!

Sugar Rate : वाढत्या उन्हाबरोबर साखर उद्योगाचाही वाढला गोडवा, नेमका परिणाम काय ?

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.