शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला दांडक्याने बडवलं, रिकाम्या गाडीचं वजन वाढवण्यासाठी….

गाडीतून ज्यावेळी दगड फेकण्यात आले, त्यावेळी हा सगळा प्रकार एका शेतकऱ्यांनी पाहिला आणि संबंधित शेतकऱ्याला हा सर्व प्रकार सांगितला.

शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला दांडक्याने बडवलं, रिकाम्या गाडीचं वजन वाढवण्यासाठी....
Dhule
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 1:36 PM

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात शेतकऱ्यांची (Farmer) फसवणूक झाल्याचा प्रकार उघडीस आला, नंतर शेतकऱ्यांनी व्यापाराला झोप दिल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील बोरीस येथे एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला कापूस विकला. मात्र त्या आगोदर व्यापाऱ्याच्या एका व्यक्तीने ज्या गाडीत कापूस (Cotton crop) भरायचा होता. त्या गाडीच्या वजनात काट्यात हेराफेरी केली. ज्यावेळी रिकाम्या गाडीचं वजन करण्यात आलं. तेव्हा गाडीमध्ये दोन तीन क्विंटल दगड भरले होते आणि शेतकरीला सांगितलं की ‘तुम्ही पुढे चला गाडी आम्ही घेऊन येतो’. गाडीतून ज्यावेळी दगड फेकण्यात आले, त्यावेळी हा सगळा प्रकार एका शेतकऱ्यांनी पाहिला आणि संबंधित शेतकऱ्याला हा सर्व प्रकार सांगितला.

तोवर गाडीत कापूस भरला गेला होता. वजनात हेराफेरी करून शेतकऱ्यांनी लुबाडणूक करणाऱ्या व्यापारी प्रतिनिधीला संतप्त शेतकऱ्यांनी काठीने चोप दिला. शेतकऱ्यांनी नंतर पोलिसांना बोलून त्या व्यापारी प्रतिनिधीला ताब्यात दिले. या प्रकरणी सोनगीर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. मात्र शेतकऱ्यांना लुटणाऱ्याला शेतकऱ्यानी दिलेला चोप सोशल मीडियावर वायरल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी हा विडिओ पाहून, लुटारूंना अशीच अद्दल घडली पाहिजे, अशा भावांना व्यक्त केल्या. शेतकरी हा काबाड कष्ट करून कापसाचं उत्पादन घेतो आणि व्यापारी अशी लूट करत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.

मोहफुल हे रोजगाराचे मुख्य साधन

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यात असलेल्या आदिवासी रोजगाराचे साधन म्हणजे मोह फुल. उन्हाळ्यात या फुलांची गळ सुरु होते आणि आदिवासी ते गोळा करतात. औषधी महत्व असलेल्या या मोहफुलांची यंदा अवकाळी पावसामुळे मोठी झड झाली आहे. मात्र आज ही झाडांवर असलेल्या या फुलांची गळती वेचण्यासाठी लगबग सुरु असून गोळा केलेले मोह फुल वाळविण्याचे काम सुरु असल्याच पहावयास मिळत आहे. मोहाच्या फुलापासून उत्तम प्रतीची दारु होत असली तरी तिचे विविध औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे मोहफुलापासून वाईन निर्मिती करावी असा प्रस्ताव शासनाकेडे प्रलंबित आहे. तर अनेक उपायांवर मोहफुल गुणकारी ठरत असल्याने त्याला अधिक मागणी असते. त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी मोहफुल हे रोजगाराचे मुख्य साधन बनले आहे.