AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Change : खरिपात मुख्य पिकाला औषधी वनस्पतीचा पर्याय, कमी खर्चात अधिकच्या उत्पन्नासाठी मधला मार्ग

औषधी वनस्पतीला बारामाही मागणी असते. त्यामुळे मार्केटचा विषय नाही तर उत्पादनाचा आहे. सध्या जून महिना अंतिम टप्प्यात आहे आणि अजून म्हणावे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जूनच्या अंतिम टप्प्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात औषधी वनस्पतीची लागवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे.

Crop Change : खरिपात मुख्य पिकाला औषधी वनस्पतीचा पर्याय, कमी खर्चात अधिकच्या उत्पन्नासाठी मधला मार्ग
औषधी वनस्पती
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 19, 2022 | 5:24 PM
Share

मुंबई : राज्यासह इतरत्र सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. (Monsoon) पावसाने उघडीप दिली असली तरी बळीराजा मात्र पू्र्ण तयारीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा भर आहे हंगामातील भात, मका, कापूस, सोयाबीन या पिकांवरच आहे. असे असले तरी पीक पध्दतीमध्ये बदल करुन अधिकच्या उत्पादनासाठी काही शेतकऱ्यांचा प्रयोग हा सुरु आहे. अशात कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळवण्याचा रामबाण मार्ग म्हणजे (Medicinal Plant) औषधी वनस्पती. आजही शेतकरी या प्रकरची शेती करतात पण त्याचे प्रमाण नगण्य आहे. बाजारपेठेत औषधी वनस्पतीला अधिकची मागणी आहे. असे असताना क्षेत्र वाढवण्याची शेतकऱ्यांना सुवर्णसंधी आहे. शिवाय याकरिता सरकारी मदतही केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी या वनस्पतीकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

हीच योग्य वेळ निर्णय घेण्याची

औषधी वनस्पतीला बारामाही मागणी असते. त्यामुळे मार्केटचा विषय नाही तर उत्पादनाचा आहे. सध्या जून महिना अंतिम टप्प्यात आहे आणि अजून म्हणावे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जूनच्या अंतिम टप्प्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात औषधी वनस्पतीची लागवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे. यावेळी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. शिवाय पावसाळ्यात सिंचनाचा खर्च वाचू शकतो. या वेळी लागवड करता येणाऱ्या औषधी वनस्पतींमध्ये लिंबाचा घास, कवचबीज, ब्राह्मी व कोरफड या वनस्पतींचा प्रामुख्याने समावेश होतो.

कवचबीज

कवच बीज ही एक मैदानी प्रदेशातील झाडाझुडपासारखी वनस्पती आहे. याची लागवड शेतकरी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करू शकतात. पेरणीसाठी एकरी 6 ते 8 किलो दराने बियाणे लागते. एका एकरात या बीजाची लागवड करण्यासाठी 50-60 हजार रुपये खर्च येतो, तर कमाई 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. कृषी विभागाने याबाबत जनजागृती केली तर अधिकचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.

ब्राह्मी सोबतच कोरफडीचीही लागवड

औषधी वनस्पतीमध्ये ब्राम्ही ही लोकप्रिय आहे. या वनस्पतीचा वापर अनेक प्रकारच्या औषधांमध्ये केला जातो. कंपनीकडून थेट शेतकऱ्यांशी या वनस्पतीसाठी करार केला जातो. गरजेनुसार मागणी आणि त्याचप्रमाणात पुरवठा करुन शेतकरी चांगला नफा कमवू शकतात.सध्याचा काळ हाच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य आहे. शेतकरी यावेळी ब्राह्मीसोबत कोरफडचीही लागवड करू शकतात. ही एक प्रचलित वनस्पती आहे आणि अलिकडच्या वर्षांत त्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. कोरफड लागवडीसाठी शेतकऱ्यांना अजूनही पुरेसा वेळ आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ते बसवता येईल. शिवाय आरोग्यविषयक या वनस्पतीचे महत्व असून दिवसेंदिवस मागणीही वाढत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?