अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर ‘वन’, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

शेती व्यवसयामधले सर्वात मोठे संकट म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. गेल्या तीन वर्षापासून तर याचा प्रत्यय अधिक तीव्रतेने येत आहे. मात्र, सुधारित वाण, यांत्रिकीकरणात झालेला बदल आणि शेतीमाल बाजारपेठेत पोहचवण्याची अत्याधुनिक प्रणाली यामुळे नैसर्गिक संकटावर देखील मात करुन शेतकरी उत्पादनात वाढ करीत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही फळे आणि भाजीपाला निर्यातीमध्ये महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे.

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर 'वन', काय आहेत कारणे? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:34 PM

पुणे : शेती व्यवसयामधले सर्वात मोठे संकट म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. गेल्या तीन वर्षापासून तर याचा प्रत्यय अधिक तीव्रतेने येत आहे. मात्र, सुधारित वाण, (In mechanization) यांत्रिकीकरणात झालेला बदल आणि (Agricultural Goods) शेतीमाल बाजारपेठेत पोहचवण्याची अत्याधुनिक प्रणाली यामुळे नैसर्गिक संकटावर देखील मात करुन शेतकरी उत्पादनात वाढ करीत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही फळे आणि भाजीपाला (Export) निर्यातीमध्ये महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे. सन 2020-21 या वर्षात देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती पैकी एकट्या महाराष्ट्रातून 8 लाख कांद्याची निर्यात होती. भाजीपाल्याप्रमाणेच फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी एकट्या महाराष्ट्रातून 1 हजार 500 कोटी रुपयांचे उत्पादन हे कांदा निर्यातीमधून मिळाले आहे. शेती व्यसायात होत असलेल्या बदलाचे चित्र आहे.

पायाभूत सुविधांमुळेच हे शक्य

काळाच्या ओघात उत्पादनात तर वाढ होतच आहे पण बाजार जवळ करण्यासाठी पायाभूत सुविधाही पुरवल्या जात आहेत. शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेली विमानतळे, बंदरे, 10 कोरडी बंदरे ,क्वारंटाईन लॅब, फूडपार्क यासारख्या अत्याधुनिक सुविधा ह्या वाढत आहे. शिवाय शेतकरी हे स्वीकारत आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेची जोड मिळू लागली आहे. शिवाय शेतीमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे.

भाजीपाला निर्यातीमध्ये कांदाच ‘टॉपवर’

कांदा हे बेभरवश्याचे पीक असले तरी देखील निर्यातीमध्ये आणि परकीय चलन मिळवून देण्यामध्ये या पिकाचा मोठा वाटा राहिलेला आहे. एवढेच नाही तर देशातील बाजारभाव टिकून ठेवण्यासाठी कांदा निर्यात उपयुक्त ठरत आहे. गतवर्षी देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली. पैकी एकट्या महाराष्ट्रतील 8 लाख टन कांदा होता. कांद्याचे दर जरी घडीत बदलत असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात असल्याने दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढत आहे.

कृषी विभागाचीही मोठी भूमिका

शेतामालाच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे याकरिता पणन मंडळ आणि कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही सर्व प्रक्रिया माहित होत असून त्याचा शेतीमालाची निर्यात करताना फायदा होत आहे. तर दुसरीकडे पणन मंडळाकडूनही बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी अन् उन्हाळी हंगामात झाली ‘ही’ क्रांती

Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

काय सांगता? महावितरणच देणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, एकाच मोर्चात अनेक प्रश्न मार्गी..!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.