PM Kisan Yojna : प्रतीक्षा संपली, 11 वा हप्ताही होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, 21 हजार कोटींची तरतूद

| Updated on: May 29, 2022 | 3:19 PM

10 वा हप्ता जमा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. 1 जानेवारी रोजी 10 हप्ता जमा झाल्यानंतर एप्रिल महिन्यात 11 वा हप्ता होईल अशी अपेक्षा होती. पण कधी कधी उशीर होतो. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सरकार एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या काळात कधीही हप्ते पाठवू शकते.

PM Kisan Yojna : प्रतीक्षा संपली, 11 वा हप्ताही होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, 21 हजार कोटींची तरतूद
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us on

मुंबई : 1 जानेवारी रोजी (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असताच 11 वा हप्त्याची चर्चा सुरु झाली होती. गेल्या महिन्याभरापासून तर शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. अखेर (Central Government) केंद्र सरकारने 11 व्या हप्त्याची तारिख जाहीर केली असून 31 मे रोजी या योजनेचे 2 हजार रुपये (Farmer Account) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्र्याच्या कार्यालयातून देण्यात आले आहेत. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे गरीब कल्याण संमेलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे. याबरोबरच विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग म्हणून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे पुसा येथील शेतकऱ्यांसोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वर्षाकाठी 6 हजार रुपये सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये अनौपचारिकपणे सुरू करण्यात आली. तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून 24 फेब्रुवारी 2019 रोजी औपचारिक आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

शिमला येथे होणाऱ्या “गरीब कल्याण संमेलन” या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ केंद्रीय मंत्रालयांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 16 योजनांच्या अनुशंगाने लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, एक राष्ट्र-एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा

10 वा हप्ता जमा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. 1 जानेवारी रोजी 10 हप्ता जमा झाल्यानंतर एप्रिल महिन्यात 11 वा हप्ता होईल अशी अपेक्षा होती. पण कधी कधी उशीर होतो. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सरकार एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या काळात कधीही हप्ते पाठवू शकते. ई-केवायसी करून घेण्यासाठी आता फक्त लाभार्थ्यांकडे दोनच दिवस राहिलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

योजनेचा निधी असा करा चेक

या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. याकरिता योजनेच्या संकेतस्थळाला (pmkisan.gov.in) भेट दिल्यास ‘Farmer Corner’मध्ये लिहिलेली लाभार्थी स्थिती दिसेल. त्यावर क्लिक केल्यास दोन पर्याय असतील. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्ही पैसे नुकतेच आले आहेत की नाही हे तपासू शकता. हे लक्षात ठेवा की, फॉर्म भरताना तुम्ही ज्या अकाउंटमध्ये प्रवेश केला होता, तोच अकाउंट नंबर आहे.