Kharif Season : उत्पादन वाढीसाठी कायपण..! खत, बियाणेही बांधावर, कृषी विभागाचे नियोजन काय?

खरीप हंगाम निसर्गावर अवलंबून असला तरी उत्पादन वाढीसाठी शेतकरी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना आता कृषी विभागाची साथ राहणार आहे. असे असले तरी वर्षागणिस खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात 4 लाख 18 हजार 561 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरा झाला होता. यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून 4 लाख 37 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

Kharif Season : उत्पादन वाढीसाठी कायपण..! खत, बियाणेही बांधावर, कृषी विभागाचे नियोजन काय?
सध्या शेतशिवरामध्ये खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु असून कृषी विभागानेही योग्य नियोजन केले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 10:47 AM

वर्धा :  (Kharif Season) खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना आता प्रतिक्षा आहे ती पावासाची. यंदा लवकर आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले मात्र, प्रत्यक्षात पेरणी योग्य पाऊसच झालेला नाही. असे असले तरी (Agricultural Department) कृषी विभागाकडून योग्य असेन नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच (Rain) पाऊस झाला की लागलीच चाढ्यावर मूठ ठेवता यावी या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पोहचविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरीपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम साध्य केला जाणार आहे.

नेमकी यंत्रणा राबणार कशी?

शेतकरी आणि कृषी विभाग यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी शेतकरी बचतगटापासून ते शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख यांच्या वतीने व्यवहार पूर्ण करुन संबंधित गावात पुरवठा करुन घ्यावा लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ

खरीप हंगाम निसर्गावर अवलंबून असला तरी उत्पादन वाढीसाठी शेतकरी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना आता कृषी विभागाची साथ राहणार आहे. असे असले तरी वर्षागणिस खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात 4 लाख 18 हजार 561 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरा झाला होता. यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून 4 लाख 37 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे आणि खत पोहचविण्यासाठी 283 गट आहे.

हे सुद्धा वाचा

खत, बियाणे पोहचवण्याची जबाबदारी शेतकरी गटांची

कृषी विभागाने केलेले नियोजन योग्य पध्दतीने पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या संस्था राहबणार आहेत. कृषी विभागाशी निगडीत असलेल्या संस्था शेतकऱ्यांना खत आणि बियाणे पुरविण्याचे काम करणार आहे. वर्धा तालुक्यात 1772, सेलू तालुक्यात 1760, देवळी तालुक्यात 1854, आर्वी तालुक्यात 1486,आष्टी तालुक्यात 1196, कारंजा तालुक्यात 1780, हिंगणघाट तालुक्यात 1970 तर समुद्रपूर तालुक्यात 1980 असे एकूण 13798 शेतकऱ्यांच्या बांधावर 283 गटांच्या माध्यमातून बियाणे आणि खत पोहचविले जाणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.