Weather Alert | रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड ॲलर्ट, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Weather Alert | रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड ॲलर्ट, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 8:04 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. ज्येष्ट हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (IMD Mumbai issue weather and monsoon alert for next five days in state)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अ‌ॅलर्ट
भारतीय हवामान विभागानं रविवार 11 जुलैचा अ‌ॅलर्ट जारी करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

सोमवारी काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागानं सोमवारी 12 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं मंगळवारी 13 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी परभणी, हिंगोली,नांदेड पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं बुधवारी 14 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर जालना परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Weather Alert : राज्यात आजपासून मुसळधार, पुढील 4 दिवस कुठे-कधी पाऊस?

Weather Update: राज्यात पावसाचा मोठा खंड, पिकं करपू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

(IMD mumbai issue weather and monsoon alert for next five days in state)