सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?

| Updated on: Dec 02, 2021 | 11:09 AM

खरिपातील कांदा बाजारात येण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला त्यांना चांगला मोबदला मिळाला पण आता केंद्र सरकारची धोरणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठावच नाही शिवाय निर्यातीबाबतही धरसोड होत असल्याने दर ढासळले आहेत.

सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : योग्य दराच्या प्रतिक्षेत नाशिक जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात कांदाचाळीत कांदा हा साठवणूक केलेला असतो. आता (Summer onion) उन्हाळी कांदा हा मार्च-एप्रिलच्या दरम्यान साठवणूकीस सुरवात होते. (Kharif Onion) खरिपातील कांदा बाजारात येण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ( storage of onions) साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला त्यांना चांगला मोबदला मिळाला पण आता केंद्र सरकारची धोरणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठावच नाही शिवाय निर्यातीबाबतही धरसोड होत असल्याने दर ढासळले आहेत.

त्यामुळे क्विंटलमागे जवळपास 700 रुपयांचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ऑक्टोंबर महिन्यात 3 हजारावर गेलेला कांदा आता अंतिम टप्प्यात 2 हजार रुपये प्रमाणे विकावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत ऑक्टोंबरच्या तुलनेत कांद्याचे दर हे 1 हजार रुपयांनी घसरलेले आहेत.

सहा महिने कांद्याची साठवणूक

उन्हाळी कांद्याची काढणी झाली की लागलीच कांद्याला दर नसतो. आवक वाढल्याने हा परिणाम एप्रिल-मे च्या दरम्यान बाजारपेठेत पाहवयास मिळतोच. त्यामुळे सोलापूर, नाशिक, अहमदनगर येथील शेतकरी कांदाचाळीत दर वाढीच्या अपेक्षेने साठवणूक करतात. त्याप्रमाणे ऑक्टोंबर महिन्यात 3 हजार 200 चा दर उन्हाळी कांद्यालाही मिळाला होता. पण शेतकऱ्यांनी अधिकच्या दर वाढीच्या अपेक्षाने कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा निर्णय घेतला. आता मागणीच नसल्याने 2 हजार रुपये क्विंटलवर उन्हाळी कांदा आला आहे.

वातावरणातील बदलाचाही परिणाम

गेल्या सहा महिन्यापासून हा उन्हाळी कांदा चाळीत आहे. शेतकरी वेळोवेळी याची देखभाल करतात पण आता गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कांदा हा चाळीतच आहे. परिणामी कांदा सडू लागल्याने शेतकरी विक्रीची लगबग करीत आहे. पण कांद्याच्या दर्जानुसार सध्या 15 ते 20 रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. हाच दर ऑक्टोंबर महिन्याच्या शेदवटी 30 रुपये किलो असा होता. आता अधिकचा काळ आणि वातावरणातील बदलामुळे कांदा हा सडू लागला आहे.

काय आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला?

उन्हाळी कांद्याची गेल्या 6 महिन्यापासून साठवणूक करण्यात आली आहे. वेळोवेळी वातावरणातील बदलाचा परिणाम त्यावर झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात कांद्याची विक्री करणे गरजेचे आहे. शिवाय आता खरिपातील लाल कांदाही बाजारपेठेत आल्यावर उन्हाळी कांद्याचे मार्केट अजूनच कमी होईल त्यामुळे कांद्याची विक्रीच शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

रब्बीचा पेरा झाला आता आंतरमशागतीचे महत्व जाणून घ्या..!

ठिबक सिंचनाचा वाढता वापर अन् घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांचे नियोजनही महत्वाचे