ठिबक सिंचनाचा वाढता वापर अन् घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांचे नियोजनही महत्वाचे

काळाच्या ओघात पिक पध्दतीमध्ये आणि सिंचनामध्ये देखील अमूलाग्र बदल होत आहेत. पूर्वा पाठाद्वारे पाणी दिले जात होते. आता पाठाची जागा ठिबकने घेतली आहे. शिवाय ठिबकच्या वापरासाठी सरकारकडूनही मदत केली जात आहे. या अत्याधुनिक पध्दतीमुळे शेतकऱ्यांचे परीश्रम तर कमी झाले आहेच शिवाय पाणी बचत होऊन उत्पादनात वाढ होत आहे.

ठिबक सिंचनाचा वाढता वापर अन् घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांचे नियोजनही महत्वाचे
ठिबक सिंचन योजना

लातूर : काळाच्या ओघात पिक पध्दतीमध्ये आणि (Drip irrigation) सिंचनामध्ये देखील अमूलाग्र बदल होत आहेत. पूर्वा पाठाद्वारे पाणी दिले जात होते. आता पाठाची जागा ठिबकने घेतली आहे. शिवाय ठिबकच्या वापरासाठी (Maharashtra) सरकारकडूनही मदत केली जात आहे. या अत्याधुनिक पध्दतीमुळे (Farmer) शेतकऱ्यांचे परीश्रम तर कमी झाले आहेच शिवाय पाणी बचत होऊन उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, महागड्या ठिबक सिंचन सठाची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे.

पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांचे परीश्रम कमी होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. शिवाय ठिबकचे महत्व शेतकऱ्यांना पटलेले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात ठिबकचा सर्वाधिक वापर केला जात आहे. मात्र, ठिबक वापराला काही मर्यादा देखील आहेत. पिकानुसार ठिबकाचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र, महागडे ठिबक काही कारणांमुळे बंदही पडू शकते. त्यामुळे वापर झाल्यावर ठिबक संचाची कशी काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.

ठिबक सिंचन वापरताना घ्यावयाची काळजी

सर्रास शेतकरी संचाची खरेदी केली की थेट वापर करण्यास सुरवात करतात. मात्र, वापरापूर्वीच माती व पाणी याबाबत शास्त्रीयदृष्ट्या माहिती करुन घेणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. अधिकचे प्रमाण असल्यास या क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर घातक ठरतो. कारण लोहाच्या प्रमाणामुळे ठिबकचे ड्रीप हे बंद पडू शकते. शिवाय पुन्हा सुरु होणार की नाही हेही सांगता येत नाही. त्यामुळे पंपसेट, ठिबकवरील पाण्याचा दाब, खत देण्यसाठीची यंत्रणा ही तपासणे गरजेचे आहे.

हंगाम संपल्यानंतरही व्यवस्थापन गरजेचे

एकदा विकत घेतलेल्या ठिबक संचाचा पूरेपूर वापर होणे गरजेचे आहे. एक हंगाम संपल्यावर दुसऱ्या हंगामात ठिबकचा वापर करण्यापूर्वी क्लोरीन किंवा मला ची आवश्यकतेनुसार प्रक्रिया करणे फायद्याचे असते. तर जिवाणूमुळे तयार झालेले अडथळे दूर करण्यासाठी क्‍लोरिन प्रक्रिया करतात. क्‍लोरिन प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण ठिबक पाण्याने स्वच्छ करून घेणे आवश्यक असते. आम्ल पाण्यात मिसळण्यासाठी पाण्यात आम्ल टाकावे पण पाणी आमलात टाकू नये. क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची हाताळणी सुरक्षात्मक दृष्टीने करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचाच्या मुख्यनळ शक्यतो दीड फुटापर्यंत जमिनीमध्ये गाडावे. असे केल्याने पाइपवर सूर्यकिरणांचा परिणाम होत नाही व त्याचे आयुष्यमान वाढते.

खते फवताना अशी घ्या काळजी

ठिबकद्वारे केवळ पिकांना पाणीच मिळते असे नाही तर रासायनिक द्रव्ये पाण्यामध्येत सोडून अन्नद्रव्यही पिकाला पुरवले जातात. आठवड्यातून एकदा वाळू गाळणेच्या टाकीचे झाकण उघडावे. त्यातील वाळू हाताने ढवळून काढावी. जाळीचे फिल्टर उघडून त्यातील गाळणी काढावी.त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी व नंतर बसवावी.कोणत्याही पाईप अथवा लेटर मधून पाण्याची गळती होऊ देऊ नये. ठिबक संचाद्वारे खते देतांना खतेही पाण्यात 100% विरघळणारी असावीत.

संबंधित बातम्या :

Farmer Sucied : सन 2020 मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI