करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?

सध्या करडईला 10 प्रति क्विंटलचा भाव असतानाही शेतकरी हे हरभऱ्यावरच भर देत आहेत. कारण लातूर जिल्ह्यात तब्बल 1 लाख 47 हजार हेक्टरावर हरभऱ्याचाच पेरा झाला आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर भर दिला आहे. मात्र, पेरणी होताच पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

करडई 10 हजारावर तरीही शेतकऱ्यांचा भर हरभाऱ्यावरच, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : महिनाभर उशिराने का होईना आता (Rabi Season) रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा शेतकऱ्यांनी (Gram Sowing) हरभऱ्यावरच अधिकचा भर दिलेला आहे. सध्या करडईला 10 प्रति क्विंटलचा भाव असतानाही शेतकरी हे हरभऱ्यावरच भर देत आहेत. कारण लातूर जिल्ह्यात तब्बल 1 लाख 47 हजार हेक्टरावर हरभऱ्याचाच पेरा झाला आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर भर दिला आहे. मात्र, पेरणी होताच पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

खरिपात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभरा, गहू ही मराठावाड्यातील दोन्ही हंगामाची स्थिती असते. यंदा मात्र, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने समीकरणे ही बदललेली आहेत. ऐनवेळी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बाजूला सारत ऊस लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामात आातापर्यंत 1 लाख 72 हजारावर पेरा झाला असला तरी यापैकी हरभरा हे पिक 1 लाख 47 हजार हेक्टरावर आहे. तर उर्वरीत सर्व पिके ही 25 हजार हेक्टरावरच आहेत. तर शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीवर अधिकचा भर दिलेला आहे.

म्हणून हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांचा भर

रब्बी हंगामातील मुख्य पिक हे करडई हेच होते. मात्र, काळाच्या ओघात उत्पादनाच्या दृष्टीने यामध्ये बदल झाला असून हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. करडईच्या पिकाबद्दल शेतकऱ्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती ही झालेली नाही. तर यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. शिवाय हंगामाच्या पूर्वीच कृषी विभागाने हरभरा पिकाचे उत्पादन घेण्याचे अवाहन केले होते. त्यामुळे रब्बी हंगामात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. हरभरा कमी पाण्यात आणि कमी वेळेत पदरात पडणार पिक आहे. शिवाय योग्य दर मिळाला नाही तरी घरी त्याचा वापर करता येतो.

पारंपारिक पिकावरच भर

सध्या करडईला बाजारात 10 हजार रुपये क्विंटल असा दर आहे. असे असतानाही करडईचे क्षेत्र नगण्य आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आणि वातावरणाचा अभ्यास करिता करडईचे उत्पादन घेतले असते तर फायद्याचे ठरणार आहे. आता क्षेत्र घटल्याने उत्पादनात घट होणार परिणामी मागणी वाढल्याने करडईलाच अधिकचा दर राहणार. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांनी तरी करडईचा पेरा करण्याचे अवाहन कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी केले आहे.

हरभऱ्यासाठी कृषी विभागाचाही पुढाकार

पावसामुळे यंदा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत शेत जमिनी ह्या चिभडलेल्या होत्या. त्यामुळे या क्षेत्रावर ज्वारीपेक्षा हरभऱ्याची पेरणी केली तर उत्पादन वाढणार असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला होता. शिवाय यंदा अनुदानावर हरभरा हेच बियाणे कृषी विभागाने उपलब्ध केले होते. त्याचा परिणाम आता पेरणीच्या दरम्यान दिसून येत आहे. कृषी विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे पुसा 256, पंत जी 114, KWR 108 आणि KWR 850 इत्यादी सुधारित बियाणांचा बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’?

आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI