AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?

खरिपात खत टंचाई अटळ आहे. खतासाठी आवश्यक असलेला कच्च्या मालाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे तर दुसरीकडे मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य नियोजनाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे खरिपाला आवधी असला तरी मात्र, कृषी विभागाकडून नियोजनाला सुरवात झाली आहे. ओढावणारी परस्थिती लक्षात घेता खत विक्रीचे नियम आणि आहे त्या साठ्याचा योग्य वापर याअनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांकडून बैठका सुरु झाल्या आहेत.

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?
रासायनिक खत
| Updated on: Mar 31, 2022 | 5:58 AM
Share

लातूर : खरिपात खत टंचाई अटळ आहे. (Chemical Fertilizer) खतासाठी आवश्यक असलेला कच्च्या मालाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आहे तर दुसरीकडे मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य नियोजनाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे (Kharif Season) खरिपाला आवधी असला तरी मात्र, (Agricultural Department) कृषी विभागाकडून नियोजनाला सुरवात झाली आहे. ओढावणारी परस्थिती लक्षात घेता खत विक्रीचे नियम आणि आहे त्या साठ्याचा योग्य वापर याअनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांकडून बैठका सुरु झाल्या आहेत. रासायनिक खत विक्रेत्यांना आधार कार्ड धारक शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनद्वारेच खताची विक्री करावी लागणार आहे. शिवाय एमआरपी पेक्षा जास्त किमतीने खताची विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खताची टंचाई निर्माण झाली तरी त्याची अधिकची झळ बसू नये यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.

कशामुळे जाणवणार टंचाई?

भारतामध्ये सर्वाधिक खताचा पुरवठा हा रशियामधून केला जातो. मात्र, यंदा युध्दाच्या परस्थितीमुळे खताची आणि कच्च्या मालाची आवकच झालेली नाही. खरीप हंगामाच्या 1 महिनापूर्वीच खताची आयात होत असते. पण अद्यापपर्यंत ती प्रक्रियाच पूर्णच झालेली नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांचा भर हा रासायनिक खतावरच राहिलेला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी यंदा योग्य नियोजनातूनच शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागणार आहे.

कृषी विभागाच्या काय आहेत सूचना?

यंदा खरिपात सर्वच प्रकारच्या खताचा पुरवठा होईव याबाबत कृषी विभागही अनभिज्ञ आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत असलेल्या खते शेतकऱ्यांनी आताच खरेदी करुन ठेवणे गरजेचे आहे. जून व जुलैमधील मंजूर आवंटन एप्रिल व मे महिन्यात प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे. डीएपी खताचा साठा विक्रत्यांकडे असेल तर तात्काळ त्याची विक्री करावी लागणार आहे. याला पर्याय म्हणून 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व 20 किलो युरिया वापरासाठी जनजागृती महत्वाची राहणार आहे.

शेतकऱ्यांचे हित आणि योग्य नियोजनावर भर

सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचे हित जोपासण्यावर कृषी विभागाचा भर राहणार आहे. दरवर्षी बोगस खतातून शेतकऱ्यांची फसवणूक होते. यासाठी जिल्हा निहाय पथके नेमण्यात येणार आहेत. आहे तो साठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ही जबाबदारी पथकांची राहणार आहे.बनावट खते, बियाणे आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Sugarcane Sludge: हंगामाच्या अंतिम टप्प्यात पेटणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, ऊस फडात अन् कारखान्यांची आवराआवर

Toor Crop : केंद्र सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण, ज्याची भीती शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा..!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.