आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, अनेक शिवसैनिक मला भेटून माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत, हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीयंत. त्यामुळे आम्ही काही चूक केली किंवा पक्ष सोडलायं किंवा आम्ही गद्दारी केली असे अजिबातच नाहीयं.
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरी जाऊन हात पाय तोडण्याची भाषा केली होती. या धमकी प्रकरणात आता खेड पोलिसांत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या कडुसकर कुटुंबाने घराच्या उत्तर बाजूला मलनिस्सारण आणि शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. त्यातच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
तपासात मयत महिलेचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिनेच सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली.
शेतकरी किसन लक्ष्मण कुऱ्हाडे आपल्या सात जनावरांना चारा खाण्यासाठी चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस आणि दाट धुके होते. जनावरे चारा खात असलेल्या जवळच्या ठिकाणी विजेची तार तुटून पडली होती.
सिंहगड घाट रस्त्यावर सकाळी एका वळणावर ही दरड कोसळली. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड सकाळी कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरू नव्हती, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.
एकनाथ बबन रेंगडे असे या घटनेत बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या माजी महिला सरपंच होत्या. त्या जवळे गावातील लायगुडे मळा येथे राहत. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांचे जुने कौलारू शेड आहे. दुपारी दोन वाजता त्या शेडमध्ये गेल्या असताना अचानक शेडचे छप्पर कोसळून त्यांच्या अंगावर पडले.