अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

स्कोडाने या वर्षी मे महिन्यात त्यांची 5 सीटर SUV कार Skoda Karoq लाँच केली होती. या कारला भारतात मोठी पसंती मिळत आहे.

अवघ्या नऊ महिन्यात 'या' SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 9:01 AM

मुंबई : स्कोडाने (Škoda Auto) या वर्षी मे महिन्यात त्यांची 5 सीटर SUV कार Skoda Karoq लाँच केली होती. या कारला भारतात मोठी पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. अवघ्या नऊ महिन्यांमध्ये या कारच्या सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने ही कार लिमिटेड युनिट्ससह भारतीय बाजारात दाखल केली होती. कंपनीने कारचे 1000 युनिट्स सेलसाठी उपलब्ध केले होते. आतापर्यंत त्या सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. (all units of Skoda Karoq sold out in just nine months)

सर्व युनिट्स भारतात तयार केले

कंपनीने आतापर्यंत विक्री केलेले सर्व युनिट्स भारतात तयार केले आहेत. या कारमध्ये केवळ पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये 1.5 लीटरचं TSI पेट्रोल इंजिन आहे, हेच इंजिन फोक्सवॅगन T-ROC मध्ये दिलं आहे. 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह बनवलेलं हे इंजिन 148bhp इतकी पॉवर आणि 250Nm टॉर्क जेनरेट करतं.

या SUV ची लांबी 4,382mm, रुंदी 1,814mm आणि उंची 1,605mm इतकी आहे, तर व्हिलबेस 2,638mm आणि ग्राऊंड क्लियरन्स 200mm आहे. यासोबतच या कारमध्ये 521 लीटर ची बूट स्पेस आहे जी मागील सीटला पूर्ण फोल्ड करुन 1,810 लीटरपर्यंत वाढवता येईल. Skoda Karoq ला यूरो एनसीपीकडून 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 24 लाख 99 हजार रुपये इतकी आहे.

सेफ्टी आणि इंजिनाच्या बाबतीत ही कार जबरदस्त आहे. यासोबतच Skoda Karoq मध्ये अजूनही शानदार फिचर्स आहेत. यामध्ये तुम्हाला अॅपल कारप्ले, एंड्रॉयड ऑटो आणि मिररलिंकसह 9.2 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. सोबत डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, ब्लुटूथ टेलिफोनी, नेविगेशन, रिवर्स कॅमरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी वेंट्स, 9 एयरबॅग आणि पॅनोरमिक सनरूफ देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार

(all units of Skoda Karoq sold out in just nine months)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.